Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » चीनचे पंख छाटण्याचा अमेरिकेचा प्रयत्न

चीनचे पंख छाटण्याचा अमेरिकेचा प्रयत्न

=भारताच्या सदस्यत्वावर पाकचा कांगावा=
pakistan NSA General Nasir Khan Janhuaइस्लामाबाद, [२२ जून] – अणुपुरवठादार देशांच्या गटात (एनएसजी) भारताच्या उमेदवारीला अमेरिकेने पाठिंबा देणे म्हणजे, चीनचे पंख छाटण्याचा आणि रशियाला शक्तिशाली होण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नांचा एक भागच आहे, असा कांगावा पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासिर जांजुआ यांनी केला.
एनएसजीमध्ये भारताचा समावेश करण्यासाठी अमेरिकेने संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. हा मोठ्या आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे, असे त्यांनी एनएसजीत पाकच्या दावेदावीवर आयोजित चर्चासत्रात बोलताना सांगितले. भारताच्या माध्यमातून अमेरिकेला जगात शक्तिशाली देश म्हणून समोर यायचे आहे. चीनचे पंख छाटणे, रशियाला रोखणे आणि संपूर्ण मुस्लिम जग नियंत्रणात आणणे, अशा प्रकारचा हा कट असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, पाकमधीलच प्रसारमाध्यमांनी जांजुआ यांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे. इतक्या संवेदनशील मुद्यावर अशा प्रकारे जाहीर व्यक्तव्य करणे योग्य नाही, असे एक्सप्रेस ट्रिब्युनच्या वृत्तात म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28720

Posted by on Jun 23 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (201 of 2458 articles)


=ट्रम्प यांचा सवाल= वॉशिंग्टन, [२२ जून] - अमेरिकन अध्यक्षपदासाठी प्राथमिक फेर्‍या आतापर्यंत रंगतदार ठरल्या असतानाच, ही निवडणूक आता वेगळ्याच वळणावर ...

×