Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » चीनच्या आर्थिक अधोगतीमुळे जग चिंतीत

चीनच्या आर्थिक अधोगतीमुळे जग चिंतीत

=जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची भीती=
china-map-flagवॉशिंग्टन, [१७ एप्रिल] – चीनच्या अर्थव्यवस्थेत सुरू असलेल्या अधोगतीमुळे अनेक देशांच्या अर्थमंत्र्यांनी तसेच जगभरातील बँकांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनची अशीच घसरण सुरू राहिली, तर जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
सलग तीन दशक दुहेरी विकास दर साधणार्‍या चीनच्या अर्थव्यवस्थेला गळती लागली आहे. जागतिक मंदीमुळे या देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. तिथेच, नरेंद्र मोदी सरकारच्या कठोर पावलांमुळे भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने विकास करीत असून, भारताने चीनलाही मागे टाकत जगातील प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून उदयास येणे सुरू केले आहे.
आर्थिक मंदीचा फटका बसल्यानंतर चीनने उत्पादन, गुंतवणूक आणि निर्यात हा आजवर चालत आलेला अर्थव्यवस्थेचा आधार बदलला असून, त्याची जागा आता ग्राहक व्यवहार, सेवा आणि नूतनीकरणाने घेतली आहे. पण, यामुळेही चीनची आर्थिक घसरण थांबली नाही.
चीनच्या आर्थिक घसरणीमुळे महासत्तांसोबतच विकसनशील देशांच्या अर्थमंत्र्यांनीही गंभीर चिंता व्यक्त केली आहे. यावर्षी ६.७ टक्के या दराने चीनने विकास केला. ही गंभीर बाब आहे. घसरण अशीच सुरू राहिली तर अनेक देशांना त्याचा फटका बसणार आहे, असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बैठकीत शनिवारी व्यक्त करण्यात आले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27848

Posted by on Apr 18 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (486 of 2458 articles)


३५ ठार, १००० जखमी, ९० हजार बेघर ७.३ इतकी तीव्रता अनेक जण ढिगार्‍याखाली माशिकी, [१६ एप्रिल] - जपानच्या दक्षिण-पश्‍चिम ...

×