Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » चीनच्या आर्थिक मंदीचा भारताला फटका: राजन

चीनच्या आर्थिक मंदीचा भारताला फटका: राजन

Raghuram-Rajan1बीजिंग, [२१ नोव्हेंबर] – चीनच्या आर्थिक मंदीचा फटका भारताला देखील बसला असून, याबाबतीत चीन आणि भारत समदुःखी असल्याचे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त करून सरकारच्या याबाबतच्या मताशी असहमती दर्शवली आहे.
चीनची मंदी हा जागतिक प्रश्‍न असून, यामुळे चीनला निर्यात होणार्‍या आपल्याकडील काही उत्पादनांना यामुळे फटका बसला आहे. त्याचबरोबर अनेक देशांनीही चीनला निर्यात व अमेरिकेकडून आयात करण्याचे प्रमाण कमी केले आहे, अशी माहिती राजन यांनी हॉंगकॉंगच्या एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिली.
मात्र, भारत कमोडिटी आयात करणारा देश असल्याने कमी दरात कमोडिटी आयात करणे शक्य झाले व त्यामुळेच या आर्थिक मंदीचा फटका भारताला कमी प्रमाणात बसला असेही ते म्हणाले.
गेल्या महिन्यात कोलंबिया विद्यापीठात एका कार्यक्रमादरम्यान अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भारतावर चीनच्या आर्थिक मंदीचा कोणताही परिणाम होणार नसल्याची खात्री दिली होती. भारत हा चीनच्या पुरवठा साखळीचा भाग नाही हे त्याचे मुख्य कारण असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच या मंदीकाळात भारत जगासाठी आधारस्तंभ म्हणून उभा राहू शकेल, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25641

Posted by on Nov 22 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1189 of 2458 articles)


=१.६१ कोटी फॉलोअर्स= नवी दिल्ली, [२१ नोव्हेंबर] - जगभरातील भारतीयांच्या पसंतीस उतरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर या सोशल नेटवर्किंग ...

×