Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » चीनने केली सर्वांत शक्तिशाली क्षेपणास्त्राची चाचणी

चीनने केली सर्वांत शक्तिशाली क्षेपणास्त्राची चाचणी

=१४ हजार किमीची अचूक मारक क्षमता=
Russia- Submarine Fired Missile Tested to Target ISIS in Syria from Caspian Seaबीजिंग, [२२ एप्रिल] – केवळ अमेरिकाच नाही, तर अनेक देशांच्या आतपर्यंत मारा करणार्‍या सर्वांत शक्तिशाली आंतर उपखंडीय क्षेपणास्त्राची चीनने नुकतीच यशस्वी चाचणी घेतली. ‘डॉंगफेंग-४१’ असे या क्षेपणास्त्राचे नाव असून, १४ हजार किलोमीटरपर्यंत अचूक मारा करण्याची त्याची क्षमता आहे.
एकाचवेळ १० अण्वस्त्र वाहून नेण्यासाठी ते सक्षम आहे. आम्ही या सर्वांत शक्तिशाली क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे, असे चीनच्या शासकीय वृत्तसंस्थेच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले. दरम्यान, या क्षेपणास्त्र चाचणीमुळे दक्षिण चीन आणि अमेरिकेत सुरू असलेला सागरी सीमाप्रश्‍न आणखी चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने या चाचणीवर नाराजी व्यक्त केली आहे.
अवघ्या ३० मिनिटांत जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात ते पोहोचू शकते. त्यांचा टप्पा इतका विस्तारित आहे की, युरोपपासून अमेरिकेच्या कोणत्याही शहराला लक्ष्य केले जाऊ शकते. विशेष म्हणजे, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गुरुवारीच स्वत:ला ‘कमांडर इन चीफ’ जाहीर केले. त्यामुळे ते चीनमधील आतापर्यंतच्या सर्व नेत्यांमध्ये सर्वांत शक्तिशाली झाले आहेत. गुरुवारी ते चिनी जनतेसमोर लष्करी गणवेशातही आले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27942

Posted by on Apr 23 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (456 of 2458 articles)


=कर्नाटक, पुद्दूचेरी, अरुणाचलचा समावेश= नवी दिल्ली, [२२ एप्रिल] - दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा सामना करीत असलेल्या कर्नाटक, ...

×