Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » चीनमधील आर्थिक संकट भारतासाठी फायदेशीर

चीनमधील आर्थिक संकट भारतासाठी फायदेशीर

=अरविंद पनगारिया यांचे मत=
Arvind-Panagariyaनवी दिल्ली, [२९ ऑगस्ट] – चीनमध्ये सध्या असलेली आर्थिक मंदीची स्थिती जगभरासाठी चिंतेचा विषय असली तरी भारतासाठी ही विकास साधण्याची संधी आहे. या मंदीच्या माध्यमातून भारताच्या विकासाची गती वाढणार आहे, असे मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि अर्थतज्ज्ञ अरविंद पनगारिया यांनी व्यक्त केले आहे.
विविध प्रकल्पांचा मार्ग भूमी अधिग्रहणामुळे मोकळा होणार असून वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकासारखे प्रयत्न देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. आर्थिक क्षेत्रातील वर्तमान स्थिती खर्‍या अर्थाने भारतासाठी एक सुवर्णसंधी आहे, असे मत व्यक्त करून ते म्हणाले की, ‘मंदीच्या सिद्धांताकडे दोन प्रकारे बघता येते. मंदीमुळे आपल्या मागणीत घट होणार असली तरी, चीनच्या मंदीमुळे निर्यात क्षेत्रात भारतापुढे मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. चीनला आपण करीत असलेली निर्यात तशी कमीच आहे आणि त्यामुळे फारसा फरक पडणार नाही. मात्र, चीनमधील मंदीमुळे जगभरातील निर्यात बाजार काबिज करण्याची संधी आपल्यापुढे आहे.’ अर्थमंत्री अरुण जेटली, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन आणि मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम् यांनीही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचा दावा केला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23692

Posted by on Aug 30 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1506 of 2453 articles)


वॉशिंग्टन, [२९ ऑगस्ट] - चीनमधील आर्थिक संकट आणि चलनफुगवट्याचा दर लक्षात घेता रिझर्व्ह बँक अजूनही समायोजनाच्या टप्प्यात आहे आणि चलनफुगवटा ...

×