Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » चीनी मीडियाही भारताविरोधात सरसावली

चीनी मीडियाही भारताविरोधात सरसावली

=आण्विक पुरवठादार गटात भारताच्या समावेशाला विरोध=
china-map-flagबीजिंग, [१४ जून] – आण्विक पुरवठादार गटात भारताच्या संभाव्य समावेशाला पहिल्यांदाच चीनी सरकारी माध्यमांनीदेखील कडाडून विरोध दर्शवला आहे. तसे झाल्यास भारताकडून पाकिस्तानची कुरापत काढल्यासारखे होऊन या दोन्ही देशात व पर्यायाने संपूर्ण आशियात अण्वस्त्रस्पर्धा वाढेलच; परंतु चीनचे राष्ट्रीय हित देखील धोक्यात येईल, असे तेथील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.
आण्विक पुरवठादार गटात जर भारत समाविष्ट झाला तर त्याचे संभाव्य परिणाम पाकिस्तानला नक्कीच बेचैन करतील. आण्विक क्षमतेत भारतापेक्षा मागे राहणे ही गोष्ट पाक कधीच खपवून घेणार नाही व पर्यायाने या दोेन्ही देशात अण्वस्त्रस्पर्धाच सुरू होईल. परिणामी, चीनच्या राष्ट्रीय हितासही बाधा येईल. भारताचा या गटातील समावेश आशियामध्ये अण्वस्त्रस्पर्धेला चिथावणी देईल त्यामुळे भारताने आंधळेपणाने आण्विक महत्त्वाकांक्षेला बळी पडू नये, असेही या वृत्तपत्रात पुढे लिहिले आहे.
सेऊल येथे आण्विक पुरवठादार गटाच्या सर्व सदस्य देशांची बैठक होणार आहे. त्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात अर्ध्या जगाची प्रदक्षिणा घालून भारताच्या या गटातील समावेशाच्या प्रयत्नांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे, असेही या वृत्तपत्राने लिहिले आहे. ऑस्ट्रियातील व्हिएन्नास्थित देशांच्या या गटातील अमेरिकेसह बहुसंख्य देशांनी भारताच्या सदस्यत्वासाठी सहमती दर्शवली असली तरी चीनसह न्यूझिलंड, आयर्लंड, तुर्कस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रिया आणि इतर काही देशांकडून भारताच्या सदस्यत्वासाठी विरोध व्यक्त करण्यात आला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28593

Posted by on Jun 15 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (242 of 2458 articles)


अलाहाबादेतील विशाल सभेत मोदींचे आवाहन भाजपाच्या निवडणूक प्रचाराचा शंखनाद [gallery ids="28589,28590"] अलाहाबाद, [१३ जून] - उत्तरप्रदेशचा विकास करण्यासाठी विधानसभा ...

×