Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » चीन उभा करतोय ब्रह्मपुत्रेवर जलविद्युत प्रकल्प

चीन उभा करतोय ब्रह्मपुत्रेवर जलविद्युत प्रकल्प

Jangmu power project of china on-brahmaputraपेइचिंग, [१४ ऑक्टोबर] – चीनने तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर आपला सर्वात मोठा फ्रोजन जलविद्युत परियोजन प्रकल्पाच्या सहा युनिट्सचा समावेश मंगळवारी पॉवर ग्रिडमध्ये करण्यात आला. या परियोजनेतून पाणीपुरवठ्यात अडथळा होण्याची शक्यता असल्याने भारताची चिंता वाढण्याची शक्यता आहे. युद्धाच्या वेळी चीन या बांधातून पाणी सोडण्याची शक्यता आहे त्यामुळे भारतात पुरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, या कारणामुळे भारत चिंताग्रस्त आहे. शण्णाण प्रिफेक्चरच्या ग्यासा काऊंटीमध्ये असलेले जम जलविद्युत प्रकल्प स्टेशनला जांगमू जलविद्युत या नावाने देखील ओळखले जाते. या बांधाकडे जगातील सर्वात उंच ठिकाणावर तयार करण्यात आलेले जलविद्युत केंद्राच्या रुपात बघितले जात आहे. या जलविद्युत केंद्रातून दरवर्षी २.५ अब्ज किलोवॅट तास वीज निर्माण करण्यात येणार आहे. हे मध्य तिबेटमधील वीजची समस्या दुर करेल त्याचप्रमाणे वीज कमी असलेल्या क्षेत्राचा विकास करेल, असे कंपनीच्या अधिका-यांनी सांगितले. यात जिएशू, जांगमू आणि जियाचा हे तीन बांध एकमेकांपासून २५ किलोमीटर अंतरावर आहेत, तर भारतीय सिमेपासून ५५० किलोमीटर दूर आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25119

Posted by on Oct 14 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1347 of 2458 articles)


इंदू मिल परिसरातील स्मारकाचे भूमिपूजन बाबासाहेब जगभारतील दलित, पीडित आणि शोषितांचे प्रेरणास्थान विदर्भातील शेतकर्‍यांना मधाचा व्यवसाय करण्यासाठी प्रशिक्षण द्यावे ...

×