Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » चीन करतोय् लष्कराची हेरगिरी

चीन करतोय् लष्कराची हेरगिरी

INDIA CHINA BORDERनवी दिल्ली, [८ मे] – सिंगापूरच्या एका कंपनीने मोठ्या प्रमाणावर चालणार्‍या सायबर हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, हे नेटवर्क चीनच्या इशार्‍यावर कार्यरत आहे.
गेल्या १० वर्षांपासून आशियात सक्रिय असलेल्या या नेटवर्कच्या माध्यमातून भारतीय लष्कराची हेरगिरी करण्यात येत आहे. देशातील काही महत्त्वपूर्ण व्यक्ती आणि संस्थांच्या संगणक यंत्रणा या नेटवर्कच्या माध्यमातून हॅक केल्या जात असून त्या माध्यमातून हेरगिरी केली जाते. हा दावा करणारी कंपनी सिंगापूरची असून ‘फायर आय’ असे तिचे नाव आहे. कंपनीने या हेरगिरी नेटवर्कला ‘एपीटी ३०’ असे नाव दिले असून या नेटवर्कचे मुख्य लक्ष्य भारतीय सेना, भारताची हवाई आणि समुद्राची हद्द हे आहे.
कंपनीने या नेटवर्कच्या कामाची पद्धतही उघडकीस आणली आहे. हे नेटवर्क युझर्सना प्रलोभने दाखविणारे डॉक्युमेंट्‌स मेल करते. त्यांनी ते डाऊनलोड केल्यानंतर त्यात आधीच असणारा व्हायरस सक्रिय होतो. हा व्हायरस आधी फीड केलेल्या प्रोग्रामनुसार, डेटा ट्रान्सफर करायला सुरुवात करतो. ही माहिती चीनमधील सर्व्हर्समध्ये जमा होतेे. या डॉक्युमेंटच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक कॉम्प्युटरला हा व्हायरस बाधित करतो.
जी व्यक्ती किंवा संस्था रडारवर आहे, त्याचे क्षेत्र आणि आवड लक्षात घेऊन अशा फाईल्स तयार केल्या जातात. चीनच्या दक्षिण समुद्रातील भारतीय सैन्याच्या हालचाली, कोच्चीमध्ये भारतीय विमान उपक्रमांदरम्यान, भारत-चीन सीमेवरील घटना आणि भारत-नेपाळच्या संबंधांवर लक्ष ठेवण्यासाठी अशी हेरगिरी केली जात असल्याचे ‘फायर आय’ने म्हटले आहे. कंपनीच्या अहवालानुसार, यात भारतीय टेलिकम्युनिकेशन कंपनीलाही लक्ष्य करण्यात आले आहे. या हेरगिरीचा संबंध भूतानसोबतही असल्याचे संबंधित अहवालात म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22445

Posted by on May 9 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1719 of 2453 articles)


पाटणा, [८ मे] - जदयुचे निलंबित नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी आज शुक्रवारी स्वत:चा नवा राजकीय पक्ष ...

×