Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » चीन देणार १७० लाख लष्करी अधिकार्‍यांना निरोप

चीन देणार १७० लाख लष्करी अधिकार्‍यांना निरोप

=सैन्य संख्या कमी करण्याची कवायत=
china_armyबीजिंग, [५ सप्टेंबर] – सैनिकांच्या संख्येत कपात करण्याच्या योजनेचा आणखी एक भाग म्हणून चीन सरकारने जगातील सर्वाधिक व्यापक असलेले लष्कर अर्थात पीपल्स लिबरेशन आर्मीतून १.७० लाख अधिकार्‍यांना सेवेतून कायमचा निरोप देण्याचे ठरविले आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी यापूर्वी लष्करातून तीन लाख सैनिकांची कपात करण्याची योजना जाहीर केली होती. त्यानंतर आता १.७० लष्करी अधिकार्‍यांवरही बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळणार आहे. चीनच्या लष्करात २३ लाख सैनिक व अधिकारी आहेत. ही संख्या कमी करून लष्करी खर्चातही मोठी कपात करण्याचा चीन सरकारचा विचार आहे, असे लष्करातील एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या हवाल्याने दक्षिण चीनमधील ‘मॉर्निंग पोस्ट’ या दैनिकाच्या वृत्तात म्हटले आहे.
चीनमध्ये सात लष्करी कमांड आहेत. यातील दोन कमांड आणि तीन लष्करी कॉर्प्स कायमचे रद्द करण्याचे धोरण तयार झाले आहे. ज्या लष्करी अधिकार्‍यांना सेवेतून निरोप देण्यात येणार आहे, त्यात लेफ्टनंट आणि कर्नल दर्जातील अधिकार्‍यांचा समावेश राहणार आहे. या अधिकार्‍यांना स्वेच्छा निवृत्तीचा प्रस्तावही देण्यात आला आहे, असे या वृत्तात नमूद आहे.
प्रत्येक लष्करी कमांडमध्ये दोन ते तीन कॉर्प्सचा समावेश असून, या प्रत्येक कॉर्प्समध्ये किमान ५० हजार सैनिक व अधिकार्‍यांचा समावेश आहे. सातपैकी दोन लष्करी कमांड बंद करण्याचा अर्थ १.२० लाख सैनिक आणि अधिकारी घरी बसणार असा आहे. दरम्यान, अन्य एका अधिकार्‍याच्या मते, सैनिक व अधिकार्‍यांमध्ये कपात करून, त्यांना हवाई दल व नौदलात समाविष्ट होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. सैन्य कपातीची रूपरेषा कशी राहील, याबाबतची घोषणा या महिन्याच्या अखेरीस करण्यात येणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23710

Posted by on Sep 6 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1507 of 2458 articles)


मुंबई, [५ सप्टेंबर] - प्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचेकाल शुक्रवारी मध्यरात्री कर्करोगाने निधन झाले. अंधेरी येथील कोकिलाबेन रूग्णालयात रात्री साडेबाराच्या ...

×