Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » चीन दौर्‍यावर जाणार पंतप्रधान मोदी

चीन दौर्‍यावर जाणार पंतप्रधान मोदी

narendra modi 10नवी दिल्ली, [२० एप्रिल] – पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १४ मे रोजी चीनच्या भेटीवर जाणार आहेत. या त्रिदिवसीय दौर्‍यावरून ते १६ रोजी मध्यरात्रीनंतर मायदेशी परततील.
या दरम्यान मोदी शांघाय आणि बीजिंगच्या दौर्‍यावर जाणार असून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मूळ गावालाही भेट देतील. या दौर्‍यात परदेशी गुंतवणूक आणि ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमाला चालना देण्यासह उभयपक्षी सीमाप्रश्‍नावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे मोदी यांच्या चीनभेटीच्या आधीच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी नुकताच पाकचा दौरा केला आहे. त्यांचा हा प्रथमच पाक दौरा आहे. पाकमध्ये जाणे म्हणजे आपल्या भावाच्या घरी जाण्यासारखे आहे, असे जिनपिंग यांनी म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22207

Posted by on Apr 21 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1762 of 2453 articles)


=हवामान खात्याचा इशारा= नवी दिल्ली, [२० एप्रिल] - दोन आठवड्यांपूर्वी देशाच्या विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातल्यानंतर देशभरातच ...

×