Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » छगन भुजबळांना ईडीचा समन्स

छगन भुजबळांना ईडीचा समन्स

=महाराष्ट्र सदन घोटाळा=
Chagan-Bhujbal2मुंबई, [८ मार्च] – महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने आज मंगळवारी राष्ट्रवादी कॉंगे्रसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना समन्स जारी केला असून, त्यानुसार त्यांना येत्या सोमवारी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर व्हायचे आहे.
भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्याशी संबंधित बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायदा आणि विदेशी विनिमय व्यवस्थापन कायद्यांतर्गत दाखल प्रकरणात ईडीने हा समन्स बजावला असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना अशाच प्रकारे समन्स जारी करण्यात आला होता. त्यानंतर सीबीआयने त्यांना लगेच अटकही केली होती. छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांचीही ईडीने अलीकडेच कसून चौकशी केली आहे. तथापि, त्यांना अटक करण्यात आलेली नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27218

Posted by on Mar 10 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (698 of 2451 articles)


=आम्ही चुकीचे काहीही केले नाही: श्री श्री रविशंकर यांची स्पष्ट भूमिका= नवी दिल्ली, [१० मार्च] - यमुना नदीच्या तिरावर आयोजित ...

×