Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » छुप्या युद्धाला पाकचा पाठिंबा

छुप्या युद्धाला पाकचा पाठिंबा

  • लष्करप्रमुख सुहाग यांचा आरोप
  • २०१४ मध्ये ११० अतिरेक्यांचा खात्मा
  • चीन सीमेवर शांतता

Gen Dalbir Singh Suhag, Army chiefनवी दिल्ली, [१३ जानेवारी] – स्वत:च्या भूमीवर होत असलेल्या दहशतवादी कारवायांचा मोठा फटका बसल्यानंतरही पाकचे शेपूट वाकडेच असून, पाकिस्तान जम्मू-काश्मिरातील छुप्या युद्धाला पाठिंबा देत आहे, असा आरोप लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग यांनी केला असून, सक्रिय सीमांमुळे धोका आणि आव्हाने दिवसेंदिवस वाढतच असल्याचे म्हटले आहे.
पेशावर येथील सैनिकी शाळेत अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या नरसंहारानंतर पाकिस्तान लष्कराच्या भूमिकेत काही बदल झाला किंवा नाही, हे जाणून घेण्यासाठी आम्हाला थोडी वाट बघावी लागेल, असे जनरल सुहाग यांनी मंगळवारी आपल्या वार्षिक पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. अफगाणिस्तानातील बदलती परिस्थिती आणि भारतावर होणार्‍या त्याच्या संभाव्य परिणामांवर भारतीय सुरक्षा दलांची नजर आहे, असेही जनरल सुहाग पुढे म्हणाले. आमच्या देशाला सक्रिय सीमा असल्यामुळे धोका आणि आव्हाने वाढतच आहेत. जम्मू-काश्मिरातील स्थितीबाबत बोलायचे झाल्यास पाकिस्तान येथील छुप्या युद्धाला पाठिंबा देत आहे, असे जनरल सुहाग यांनी सांगितले.
जम्मू-काश्मिरात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेला निष्पक्ष आणि भयमुक्त मतदान करता यावे यासाठी सुरक्षा दलांनी निर्माण केलेल्या पोषक वातावरणाचे लष्करप्रमुखांनी तोंड भरून कौतुक केले. या विधानसभा निवडणुकीत राज्यात ऐतिहासिक मतदान झाले होते. गेल्या काही वर्षांमध्ये २०१४ या गेल्या वर्षात जम्मू-काश्मिरात सर्वात जास्त म्हणजे ११० अतिरेकी मारले गेले. त्यापैकी १०४ अतिरेक्यांना सुरक्षा दलांच्या जवानांनी कंठस्नान घातले. २०१३ साली ६५ अतिरेकी मारले गेले होते, असेही लष्करप्रमुखांनी सांगितले.
चिनी सैनिकांच्या घुसखोरीबाबत बोलताना लष्करप्रमुख म्हणाले की, सध्या तरी चीनसोबतच्या सीमेवर शांतता आहे. आम्ही सकारात्मक चर्चेचे धोरण स्वीकारले असून, त्याचे परिणामही तसेच दिसून येत आहेत, असेही ते म्हणाले.
जशास तसे उत्तर देऊ : पर्रिकर
छुप्या युद्धाला जशास तसे उत्तर दिले जाईल. याशिवाय कोणत्याही स्तरावर द्विपक्षीय चर्चा सुरू होण्यासाठी पाकने सीमेवर संघर्षविराम टाळावा आणि अतिरेक्यांची घुसखोरी बंद करावी. छुप्या युद्धाबाबत सरकारने केलेल्या उपाययोजनांची जाहीर चर्चा करता येणार नाही. येत्या सहा महिन्यात तुम्हाला आकडेवारीतील फरक ठळकपणे लक्षात येईल. आम्हाला शेजारी देशांसोबत शांतता हवी आहे. परंतु, कुणी छुपे युद्ध केले तर त्यावर आम्ही निश्‍चितपणे प्रतिबंधात्मक उपाय करू.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19688

Posted by on Jan 14 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (2239 of 2453 articles)


=पाच वर्षात १२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मदत करणार= नवी दिल्ली, [१३ जानेवारी] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशभरात राबविण्यात ...

×