Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » छोटा राजनला इंडोनेशियात अटक

छोटा राजनला इंडोनेशियात अटक

Chhota-rajan1जकार्ता, [२६ ऑक्टोबर] – अंडरवर्ल्डचा मोस्ट वॉंटेड डॉन ‘छोटा राजन’ याला इंडोनेशियातील बाली येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. छोटा राजनला कोणत्या सुरक्षा संस्थेने अटक केली आणि त्याला कुठे नेले आहे याबाबत अद्याप काहीही माहिती देण्यात आली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलिया पोलिसांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे इंडोनेशियाच्या सुरक्षा यंत्रणांनी ट्रॅप लावून राजनला अटक केली आहे. काल रविवारी सिडनी येथून बाली या बेटावर आलेल्या राजनला तेथील एका प्रसिद्ध रिसॉर्टमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. असे बाली पोलिसांचे प्रवक्ते हेरी बियांटो यांनी वृत्तसंस्थेला सांगितले आहे.
छोटा राजन हा मुळचा फलटण तालुक्यातील गिरवी येथील आहे. त्याचे मुळ नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे असे आहे. मुंबईत काळ्या बाजाराने चित्रपटाची तिकिटे विकण्यापासून त्याने गुन्हेगारीला सुरूवात केली. १९९३ च्या बॉंम्बस्फोटानंतर छोटा शकील, दाऊद आणि राजन यांच्या टोळीत अनेकवेळा टोळीयुद्ध होऊन चकमक उडाली आहे.
दरम्यान, छोटा राजनला भारतात हस्तांतरित करण्यात येणार का याबाबत उत्सुकता आहे.
आमच्या विनंतीनुसारच अटक : सीबीआय
छोटा राजन सिडनीहून इंडोनेशियाच्या बालीकडे रवाना झाला असल्याचे इंटरपोलने स्पष्ट केल्यानंतर आम्ही लगेच इंडोनेशियन पोलिसांसोबत संपर्क साधला आणि त्याला अटक करण्याची विनंती केली. इंडोनेशियासोबत भारताने आरोप प्रत्यार्पण करार केला असल्याने त्याला भारतात आणण्यासाठी आता आम्ही पावले उचलणार आहोत. लवकरच आमचे एक पथक इंडोनेशियाला रवाना होणार आहे, अशी माहिती सीबीआयचे प्रमुख अनिल सिन्हा यांनी दिली. इंडोनेशियन पोलिसांनीही राजनला भारताच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.
कोण आहे छोटा राजन
संपूर्ण नाव : राजेंद्र सदाशिव निकाळजे
जन्म : ५ डिसेंबर १९५९ रोजी मुंबईच्या चेंबूर येथे
गुन्हेगारी सुरुवात : ८० च्या दशकात सहकार सिनेमाबाहेर तिकीट ब्लॅक करण्यापासून. लहान-मोठे गुन्हे करताना तो बडा राजनच्या संपर्कात आला.
बडा राजन आणि छोटा राजन यांनी बराच काळ दाऊद इब्राहिमसाठी काम केले.
परिवार : सुजाता ही छोटा राजनची पत्नी असून, अंकिता, निकीता आणि खुशी या तीन मुली आहेत.
चित्रपट : छोटा राजनच्या आयुष्यावर ‘कंपनी’ या नावाचा चित्रपट तयार झाला आणि तो प्रचंड गाजला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25347

Posted by on Oct 27 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1278 of 2458 articles)


पाटणा, [२६ ऑक्टोबर] - बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज सोमवारी शांत झाल्या. या टप्प्यातील मतदान बुधवार, २८ ...

×