Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » छोटा राजन तिहारमध्ये

छोटा राजन तिहारमध्ये

=सुरक्षा व्यवस्था कडक=
Chhota-rajan1नवी दिल्ली, [२० नोव्हेंबर] – इंडोनेशिया पोलिसांनी अटक केल्यानंतर भारतात आणण्यात आलेल्या अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन छोटा राजनची गुरुवारी तिहार मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली असून, या पार्श्‍वभूमीवर तिहार कारागृहाच्या सुरक्षेतही अभूतपूर्व वाढ करण्यात आली आहे.
सीबीआय कोठडीची मुदत संपल्यानंतर विशेष न्यायालयाने गुरुवारी त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली होती. यानंतर लगेच त्याची तिहारमध्ये रवानगी करण्यात आली. सोबतच, न्यायालयाने पोलिस प्रशासनाला तिहारच्या परिसरात बारकाईने नजर ठेवण्याचे आदेशही दिले. राजनच्या जीवाला धोका असल्याने त्याच्या सुरक्षेसाठी विविध कारागृहांमधील १० हेड वॉर्डर्स, १० वॉर्डर्स, एक पोलिस उपअधीक्षक आणि दोन सहाय्यक अधीक्षकांचे पथक तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती तिहार प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
दरम्यान, स्वत: पोलिस महासंचाकांनीही राजनच्या सुरक्षेच्या मुद्यावर वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली आणि सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही उणिव मान्य केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला. राजनने तिहारमधील भेटीस येणार्‍यांच्या नोंदवहीत पत्नी आणि मुंबईतील काही मित्रांची नावे नोंदविली आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25590

Posted by on Nov 21 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1201 of 2453 articles)


अमेरिकेने पुन्हा पाकला बजावले पाकची भूमी दहशतवाद्यांचे स्वर्ग असायलाच नको वॉशिंग्टन, [२० नोव्हेंबर] - दहशतवादात चांगला आणि वाईट असा ...

×