Home » कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय » जंगलतोडीमुळे पर्जन्यमानात १८ टक्क्यांनी घट

जंगलतोडीमुळे पर्जन्यमानात १८ टक्क्यांनी घट

rain_on_the_fieldनवी दिल्ली, [३ मार्च] – देशाच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर विशेषत: उत्तर भारतात होत असलेल्या जंगलतोडीमुळे पर्जन्यमानावर गंभीर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय विज्ञान परिषदेच्या आज मंगळवारी प्रदर्शित झालेल्या संशोधन अहवालात याविषयी माहिती देण्यात आली आहे.
मोठ्या प्रमाणावर होणार्‍या वृक्षतोडीमुळे, सरासरी तापमानात वाढ होण्यासह कार्बनचे वातावरणातील उत्सर्जन, पृथ्वीच्या पृष्ठभागावरून प्रकाशाच्या परावर्तनात होणारा बदल आणि वातावरणातील ओलावा या सर्वच बाबींवर परिणाम होत आहे. उष्णकटिबंधीय भागात होणार्‍या वृक्षतोडीच्या तुलनेत मध्य आणि उच्च अक्षांशावरील वृक्षतोडीचा भीषण परिणाम होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. यामुळे, दक्षिण आशियाई मान्सूनवर सर्वात वाईट परिणाम होणार असून त्यात १८ टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदलांविषयक संशोधन करणारे गोविंदासामी बाला यांच्या नेतृत्वात हा अभ्यास अहवाल तयार करण्यात आला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21082

Posted by on Mar 4 2015. Filed under कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1983 of 2453 articles)


=शिवसेनेने ओवेसीला सुनावले= मुंबई, [३ मार्च] - महाराष्ट्रात मुस्लिमांना आरक्षण देण्यात यावे, या एमआयएमचे प्रमुख असदुद्दिन ओवेसीच्या मागणीवर शिवसेनेने जोरदार ...

×