Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » जगभरातील अर्थव्यवस्था कोसळल्या

जगभरातील अर्थव्यवस्था कोसळल्या

european union -EU_flagनवी दिल्ली, [२४ जून] – ब्रिटनने युरोपियन समूहातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर होताच त्याचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थांवर दिसून आला. युरोपियन समूहाचे चलन युरो आणि ब्रिटनच्या पाऊंडसह भारतीय रुपया देखील दुपारपर्यंतच्या व्यवहारात आजवरच्या विक्रमी नीचांकावर आला होता. केवळ चलनच नव्हे, तर जगभरातील शेअर बाजारातही विक्रमी घसरण झाल्याचे दिसून आले. जगभरातच आर्थिक अस्थिरतेचे सावट निर्माण झाले होते. या व्यवहारातही अमेरिकन डॉलर मात्र मजबूत राहिला.
१९८५ नंतर जागतिक बाजारपेठेत अशा प्रकारची विक्रमी घसरण प्रथमच पाहायला मिळाली. बीबीसीने सार्वमताचा निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली आणि जागतिक बाजारावर प्रतिकूल परिणाम दिसू लागला. सकाळच्या पहिल्या तासातच भारतीय शेअर बाजार १०५८ अंकांनी खाली आला होता. डॉलरच्या तुलनेत १.५० असा भाव असलेला पाऊंडही निकालानंतर १.३६ टक्क्यांवर खाली आला होता. २०१३ नंतर येन देखील प्रथमच १०० च्या खाली आला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28772

Posted by on Jun 25 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (186 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२४ जून] - अण्वस्त्र पुरवठादार गटात (एनएसजी) प्रवेश न मिळण्याचा निर्णय भारतासाठी लाजीरवाणा असल्याची टिका कॉंग्रेस पक्षाने केली ...

×