Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » जगभरात तब्बल २० कोटी महिला, मुलींचा सुंता

जगभरात तब्बल २० कोटी महिला, मुलींचा सुंता

UNO united-nations-buildingसंयुक्त राष्ट्र, [६ फेब्रुवारी] – जगभरात तब्बल २० कोटी महिला व मुली अशा आहेत ज्यांचा सुंता करण्यात आला आहे. यांपैकी निम्म्या मुली व महिला इजिप्त, इथोपिया आणि इंडोनेशियातील आहेत. संयुक्तराष्ट्राच्या बाल कोष युनिसेफने एका अहवालाद्वारे हे सत्य उघडकीस आणले आहे.
महिलांच्या सुंता करण्याच्या प्रथेविरोधात झीरो टॉलरन्सतर्फे आंतरराष्ट्रीय दिवसापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार जगभरात सोमालिया, गिनी आणि जिबुती येथे अशी प्रकरणे सर्वाधिक आहेत. मात्र ३० देशांमध्ये ही प्रकरणे कमी झाल्याचेही दिसून आले आहे.
ही कुप्रथा बंद करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने २०३० सालापर्यंत लक्ष्य निर्धारित केले आहे. या अजेंड्याला संयुक्त राष्ट्रातील सर्व सदस्य राष्ट्रांनी सप्टेंबर २०१५ मध्ये स्वीकारले. या अहवालाच्या मुख्य लेखिका क्लाउडिया काप्पा यांच्या मतानुसार, सोमालिया, गिनी आणि जिबुतीसारख्या देशांमध्ये तर ही कुप्रथा जीवनाचा एक भागच आहे. या देशात दर १० पैकी ९ मुलींना या प्रचंड वेदनादायी प्रथेचे बळी व्हावे लागते. सोमालियात ९८ टक्के, गिनीमध्ये ९७ टक्के आणि जिबुतीमध्ये ९३ टक्के इतके भयंकर प्रमाण या प्रथेचे आहे. असे असले तरीही लाईबेरिया, बुर्किनो फासो, केनिया आणि इजिप्तमध्ये या कुप्रथेला संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने उल्लेखनीय प्रगती झाली आहे. तसेच केनिया, युगांडा, गिनी बिसाऊ, नायजेरिया आणि गाम्बिया या देशांनी या प्रथेला गुन्हे श्रेणीत समाविष्ट करण्याबाबत कायदा केला आहे.
२० कोटींपैकी ४ कोटी अल्पवयीन मुली
सुंता करण्यात आलेल्या २० कोटी महिला व मुलींपैकी ४ कोटी ४० लाख या १४ वर्षे व त्याहूनही कमी वयातील मुली आहेत. युनीसेफने या कुप्रथेला बालहक्कांचे उल्लंघन म्हटले असून ज्या ३० देशात ही प्रथा सर्वाधिक आहे, तेथे बहुतांश मुलींचा सुंता त्या पाच वर्षाच्या होण्यापूर्वीच केला जातो, असे अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26750

Posted by on Feb 7 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (856 of 2458 articles)


वॉशिंग्टन, [६ फेब्रुवारी] - युद्ध आणि दहशतवादामुळे आखाती देश आणि उत्तर आफ्रिकेमधील आर्थिक विकासाची गती मंदावली असल्याचे जागतिक बँकेने म्हटले ...

×