Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » जगातील ५० महान नेत्यांमध्ये मोदी ५व्या स्थानावर

जगातील ५० महान नेत्यांमध्ये मोदी ५व्या स्थानावर

=फॉर्च्युनच्या यादीत सत्यार्थींचेही नाव, ओबामांना स्थान नाही=
NARENDRA MODI 16न्यूयॉर्क, [२७ मार्च] – फॉर्च्युन या विश्‍वविख्यात नियतकालिकाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या जगातील ५० महान नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शांततेसाठीचा नोेबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी या दोन भारतीयांचाही समावेश केला आहे.
फॉर्च्युनने व्यवसाय, प्रशासन आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये बदल घडविणार्‍या असामान्य पुरुष व महिलांच्या आपल्या यावर्षीच्या यादीत पाचव्या स्थानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि २८ व्या स्थानावर कैलाश सत्यार्थी यांना स्थान दिले आहे. ऍपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक फॉर्च्युनच्या या यादीत अव्वल स्थानावर आहेत. जागतिक महासत्ता अमेरिकेचे शक्तिशाली अध्यक्ष असूनही बराक ओबामा यांना सलग दुसर्‍या वर्षी या यादीत स्थान मिळू शकलेले नाही. देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर सध्या अडचणींचा सामना करत असलेल्या बराक ओबामा यांनी आत्मसमर्पण केले आहे, असे ओबामा यांचा समावेश न करण्याच्या कारणाचा खुलासा करताना फॉर्च्युनने म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यास प्रारंभ केला आहे आणि भारतात व्यवसायासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या क्षेत्रात त्यांनी भरीव प्रगती केली आहे, असे नियतकालिकाने मोदींच्या नावाचा समावेश करताना म्हटले आहे. याशिवाय महिलांवर होणारे अत्याचार रोखणे, स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासह इतर आशियाई देश आणि अमेरिकेसोबतचे संबंध सुधारण्यावरही ते विशेष लक्ष देत आहेत, या शब्दात फॉर्च्युनने मोदींचे कौतुक केले आहे. असे असले तरी मोदींना अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि आपले निर्धारित लक्ष्य प्राप्त करण्यासाठी भारतातील शक्तिशाली व भ्रष्टाचारव्याप्त नोकरशाहीमध्ये सुधारणा करावी लागेल, असा सल्लाही फॉर्च्युनने दिला आहे. मोदींनी नोकरशाहीवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे आणि शक्य असेल तिथे कारवाई केली जात आहे, असे सांगतानाच येणार्‍या दोन वर्षात भारत चीनपेक्षा जास्त वेगाने विकास करेल, या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तविलेल्या भविष्याचाही फॉर्च्युनने यामध्ये उल्लेख केला आहे.
गेल्यावर्षी मलाला युसुफझई हिच्यासोबत शांततेसाठीचे नोबेल मिळाल्यामुळे सत्यार्थींकडे फारसे लक्ष गेले नाही. मात्र, गेल्या तीन दशकांपासून बालमजुरीविरुद्ध जागतिक स्तरावर ते संघर्ष करीत आहेत. बालहिंसा रोखण्यासाठी त्यांनी जेवढे कार्य केले तेवढे कुणीही केलेले नाही, असे फॉर्च्युनने सत्यार्थींचा गौरव करताना म्हटले आहे. फॉर्च्युनच्या या यादीत दुसर्‍या स्थानी युरोपीय केंद्रीय बँकेचे अध्यक्ष मारियो ड्रागी आणि तिसर्‍या स्थानावर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना स्थान देण्यात आले आहे. याशिवाय पोप फ्रान्सिस (४), जनरल मोटर्सच्या सीईओ मॅरी बारा (९), स्टारबक्सचे सीईओ हावर्ड शुल्झ (१७), बिल व मेलिंडा गेट्‌स (१८), फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग (२५), जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमोन (३८) आणि उबेरचे सीईओ ट्रॅव्हस कॅलानिक (४४) यांनाही या यादीत स्थान देण्यात आले आहे. लास्ट माईल हेल्थचे भारतीय वंशाचे सीईओ राज पंजाबी यांना ३४ वे स्थान देण्यात आले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21752

Posted by on Mar 28 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1847 of 2458 articles)


=गर्भवतींना मिळणार ‘लोअर बर्थ’= नवी दिल्ली, [२६ मार्च] - रेल्वेगाड्यांमधून एकटीने प्रवास करणार्‍या महिलांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय रेल्वेनेही पुढाकार घेतला आहे. ...

×