Home » ठळक बातम्या, मराठवाडा » जगात भारतासारखा सहिष्णू देश नाही : नाना

जगात भारतासारखा सहिष्णू देश नाही : नाना

nana-patekar1औरंगाबाद, [२७ जानेवारी] – देशात सहिष्णू-असहिष्णुतेचे वादंग पेटलेले असतानाच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी माझ्या देशासारखा सहिष्णू देश जगाच्या पाठीवर कुठलाच नाही, असे स्पष्ट करून असहिष्णुतेचा डांगोरा पिटणार्‍यांना चांगलीच चपराक हाणली. औरंगाबादेत नाम फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रकट मुलाखतीत नानांनी शेतकरी आत्महत्या आणि त्यांच्या खडतर जीवनातील अनेक पैलू उलगडले.
रुक्मिणी सभागृहात नाना पाटेकर यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी नानांनी शेतकरी आत्महत्या आणि त्यांच्या जीवनावर आधारित विविध प्रश्‍नांची अत्यंत समर्पक उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच राजेंद्र हुंजे यांनी दुष्काळी विदारक परिस्थितीमध्ये मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी काय करता येईल, असा प्रश्‍न नानांना विचारला. तेव्हा नाना म्हणाले की, आत्महत्येची कारणे शोधत बसण्यापेक्षा त्यावर काय उपाययोजना करता येईल, हे महत्त्वाचे आहे. राजकारण्यांवरील विश्‍वास उडाला असून, नवीन पिढीकडून खूप अपेक्षा आहेत.
सध्या नामचे कार्य महाराष्ट्रात सुरू आहे. मात्र, उद्या भारतात कुठेही नैसर्गिक आपत्ती आली, तर आम्हाला स्वयंसेवकांची गरज लागेल. कुठलाही जातिभेद न पाळता निष्पक्ष सेवा केली पाहिजे. या देशासारखा जगात कुठलाही देश सहिष्णू नाही, असे त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.
नाटक आणि सिनेमापेक्षा आता मला शेतकर्‍यांसाठी काही करायला अत्यंत आनंद वाटतो. नुसतं गहिवरून चालणार नाही, तर जाणिवा जागृत ठेवाव्या लागणार आहे. मी सुद्धा शेती करतो. परंतु, मी छंद म्हणून आणि शेतकरी जीवन जगण्यासाठी शेती करतो. शेतकर्‍यांना फक्त पाणी आणि वीज द्या, ते तुमच्याकडे काहीही मागायला येणार नाही, असा विश्‍वासही त्यांनी बोलून दाखविला. शेवटी हुंडा मागणारा सर्वात षंढ असल्याचे नाना म्हणाले.
हुकुमशाही असती, तर बरे झाले असते!
एका प्रश्‍नाच्या उत्तरात नाना पाटेकर म्हणाले की, राजकारण्यांवरील आपला विश्‍वास उडालेला असून शेती व शेतकर्‍यांचे प्रश्‍न पाहता, कधी कधी वाटते की, या देशात हुकुमशाही असती, तर बरे झाले असते! किमान त्यामुळे अनेक प्रश्‍न तरी सुटले असते, अशा भावना नानांनी व्यक्त केल्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26653

Posted by on Jan 29 2016. Filed under ठळक बातम्या, मराठवाडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मराठवाडा (869 of 2454 articles)


=निवडणुका झाल्यास रालोआचे पुन्हा त्रिशतक: ताज्या अभ्यासातील निष्कर्ष= नवी दिल्ली, [२७ जानेवारी] - दादरी येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेससह काही विरोधकांनी ...

×