Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » जदयुला मत न देणार्‍या नवर्‍यांना उपाशी ठेवा

जदयुला मत न देणार्‍या नवर्‍यांना उपाशी ठेवा

=नितीशकुमारांचे महिलांना अजब आवाहन=
nitish_kumarफुरवार शरीफ, [२० ऑक्टोबर] – पहिल्या दोन टप्प्यांमधील मते भाजपाच्या पारड्यात गेल्याचे स्पष्ट झाल्याने महाआघाडीत जणू भूकंपच आला. सत्ता हातातून जाण्याच्या भीतीमुळे महाआघाडीतील नेतेही अस्वस्थ झाली असून, याच अस्वस्थतेचे दर्शन घडविताना, जदयुला जो पुरुष मतदान करणार नाही, त्याला घरात जेवण मिळणार नाही, याची काळजी घ्या, असे अफलातून आवाहन मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यातील महिलांना केले आहे.
मला बिहारची सत्ता हवी आहे आणि त्यासाठी प्रत्येक पुरुषाने जदयुला मतदान करणे आवश्यक आहे. जर तुमच्या पतीने जदयुला मतदान केले नाही, तर त्याला त्यादिवशी घरात जेवायला देऊ नका. आपल्या नवर्‍याला उपाशीच ठेवा, असे नितीशकुमार यांनी फुलवार शरीफ येथे आज मंगळवारी निवडणूक सभेला संबोधित करताना सांगितले. या सभेत महिलांची उपस्थिती फार जास्त होती, हे विशेष! दरम्यान, बिहारच्या पहिल्या दोन टप्प्यात पुरुषांपेक्षा महिलांचे ५ टक्के जास्त मतदान झाले आहे. या निवडणुकीत महिलांचे मतदान फार महत्त्वाचे मानले जात आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25217

Posted by on Oct 21 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1312 of 2452 articles)


=सर्व शिक्षा अभियानातील कंत्राटी कर्मचार्‍यांची बदली, सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश= मुंबई, [२० ऑक्टोबर] - राज्यातील सर्व शिक्षा अभियानांतर्गत करार पद्धतीने ...

×