Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » जदयु-राजद यांच्यात जागा वाटपावरून मतभेद

जदयु-राजद यांच्यात जागा वाटपावरून मतभेद

=जनता परिवाराचे विलिनीकरण धोक्यात=
lalu-yadav-nitish-kumarपाटणा, [१६ मे] – बिहारमध्ये याच वर्षी होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा विजयरथ रोखण्यासाठी प्रचंड गाजावाजा करून एकत्र आलेला जनता परिवार निवडणुकीपूर्वीच फुटीच्या उंबरठ्यावर आला आहे. २४३ सदस्यीय बिहार विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून जदयु आणि राजद या दोन्ही पक्षांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत.
याच वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होणे अपेक्षित आहे. वाढती लोकप्रियता लक्षात घेता भाजपाचा विजयरथ रोखण्यासाठी पूर्वीच्या जनता दलातील विखुरलेले सहा पक्ष एकत्र आले होते आणि समाजवादी जनता पक्षाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली होती. समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव या नव्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. तथापि, विलिनीकरणाची औपचारिकता काही तांत्रिक मुद्यांमुळे पूर्ण होऊ शकली नव्हती.
जदयु आणि राजदमध्ये गेल्या काही दिवसांपासून जागावाटपाची प्रक्रिया सुरू आहे. जदयु सत्तेवर असल्याने या पक्षाला जास्त जागा हव्या आहेत. तर, केवळ राजदच भाजपाला रोखू शकतो, असा विश्‍वास असल्याने राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनीही समाधानकारक जागांची मागणी केली आहे. यावरून दोन्ही पक्षांमध्ये चांगलेच मतभेद उफाळून आले आहेत.
जागावाटपाच्या बैठकीत राजदतर्फे सहभागी असलेले माजी केंंद्रीय मंत्री रघुवंश प्रताप सिंह यांनी थेट १४५ जागांची मागणी केली आहे. उर्वरित जागा जदयु, कॉंगे्रस, राष्ट्रवादी आणि माकपला देण्यात याव्या, असा राजदचा प्रस्ताव आहे. तर जदयु आणि राजदने प्रत्येकी १०० जागा लढवाव्या व उर्वरित जागा मित्र पक्षांना द्याव्या, असा जदयुचा प्रस्ताव आहे. राजदने या प्रस्तावाला विरोध केला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22571

Posted by on May 17 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1690 of 2452 articles)


=बीजिंगमध्ये ‘‘गार्ड ऑफ ऑनर’’= बीजिंग, [१५ मे] - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीन दौर्‍यावर आहेत. आज शुक्रवारी त्यांचा दौर्‍याचा दुसरा ...

×