Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » जनता परिवाराचे विलीनीकरण कागदावरच

जनता परिवाराचे विलीनीकरण कागदावरच

=राजद, जदयु स्वतंत्रपणे लढणार विधानसभेची निवडणूक=
lalu-yadav-nitish-kumarपाटणा, [१२ मे] – देशभरातील भाजपाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रचंड गाजावाजा करून अनेक तुकड्यात विखुरलेले जनता परिवारातील घटक पक्ष एकत्र आले खरे, पण, त्यांचे हे विलीनीकरण कागदोपत्रीच राहिले आहे. कारण, बिहारमध्ये याच वर्षी होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीत या महापरिवारातील प्रमुख घटक असलेले राजद आणि जदयुने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे.
जनता परिवाराच्या विलीनीकरणाची केवळ घोषणा करण्यात आली. पण, प्रत्यक्षात विलीनीकरण मात्र झाले नाही. त्यातच गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविणार्‍या भाजपाला रोखण्याचे आजवरचे सर्वच प्रयत्न अपयशी ठरले असल्याने जनता परिवारातील घटक पक्षांची चिंता वाढली आहे. त्यामुळे वेगवेगळे लढल्यास त्याचा काही फायदा होईल, या अपेक्षेने या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समाजवादी पार्टीचे नेते रामगोपाल यादव यांनी दिली.
बिहार निवडणुकीपूर्वी जनता परिवाराचे विलीनीकरण होणे अशक्य आहे, असे मत राजदचे खासदार प्रेम गुप्ता यांनी व्यक्त केले आहे. या विलीनीकरणाच्या मार्गात अनेक तांत्रिक बाबी अडसर ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपाचा विजयरथ रोखणे आणि धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र आणणे, हाच आमचा एकमेव उद्देश आहे. पण, भाजपाला रोखण्याचे आजवर केलेले सर्वच प्रयत्न अपयशी ठरले आहेत. बिहारची निवडणूक आमच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची आहे. या निवडणुकीत भाजपाला कसे रोखायचे, हा मोठा प्रश्‍न सध्या आमच्यापुढे आहे, अशी कबुलीही त्यांनी दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22517

Posted by on May 12 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1702 of 2452 articles)


=नीती आयोग पुढील महिन्यात देणार अहवाल= नवी दिल्ली, [१२ मे] - देशभरातील गरिबांची कू्ररपणे थट्टा करणारा पूर्वीच्या संपुआ सरकारचा दारिद्र्य ...

×