Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » जनता परिवाराला मिळणार राष्ट्रवादीची साथ

जनता परिवाराला मिळणार राष्ट्रवादीची साथ

=शरद पवारांनी घेतले नितीशकुमारांसोबत जेवण=
ncp-logoपाटणा, [१० जून] – समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्या मध्यस्थीमुळे कशीबशी मने जुळून आलेल्या जनता परिवाराला कॉंगे्रसपाठोपाठ आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंगे्रसचीही साथ मिळणार असल्याचे चित्र आहे. पक्षाच्या सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनानिमित्ताने पाटण्यात असलेले शरद पवार यांनी आज बुधवारी सकाळी जदयु नेते व मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासोबत जेवण घेतले. त्यामुळे बिहारच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाढती लोकप्रियता कशी रोखायची, याच चिंतेत सध्या देशातील विरोधी पक्ष असल्याचे अलीकडील घडामोडींवरून दिसून येत आहे. सपा, जदयु, राजद, कॉंगे्रस आणि डाव्या पक्षांमध्ये याबाबत खलबते सुरू असताना, नरेंद्र मोदी यांना अधूनमधून राजकीय मार्गदर्शन करणारे शरद पवार यांनाही मोदी लाटेत राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची चिंता सतावू लागली असल्याने त्यांनीही बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीत जनता परिवाराला साथ देण्याची रणनीती आखली असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षालाही काही जागा मिळाव्या, या मुद्यावर नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यासोबत आपली चर्चा सुरू असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. आम्ही जास्त जागा मागणार नाही. जिथे आमची ताकद आहे आणि जिंकण्याची हमखास हमी आहे, त्याच जागांसाठी आमचा आग्रह राहणार आहे. चर्चा सुरू आहे. लवकरच सकारात्मक चित्र दिसून येईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.
बिहार निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रीय राजकारणाला नवी दिशा मिळणार आहे, असे सांगताना पवार म्हणाले की, राष्ट्रवादीचे खासदार तारिक अन्वर यांनी नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्याशी चर्चा केली आहे. तारिक अन्वर यांना चर्चेचे अधिकार दिले असून, त्यांच्याच निर्णयावर पुढील रणनीती अवलंबून राहणार आहे.
अन्य एका प्रश्‍नाच्या उत्तरात पवार यांनी आपला पक्ष कॉंगे्रसमध्ये विलीन करण्याची शक्यता ठामपणे फेटाळून लावली. राहुल गांधी यांच्याकडे कॉंगे्रसचे नेतृत्व सोपविण्याच्या दिशेने सुरू असलेल्या हालचालींविषयी विचारले असता, कॉंगे्रसचे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यामुळे त्या पक्षाचे नेतृत्व कुणी करावे, हा त्यांचा अंतर्गत प्रश्‍न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22800

Posted by on Jun 11 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1639 of 2452 articles)


=भारतीय लष्कराची धडक कारवाई, २० शहीद जवानांचा घेतला बदला= नवी दिल्ली, [९ जून] - केवळ इस्रायल वा अमेरिकाच नव्हे तर ...

×