Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » जनतेच्या परीक्षेत मोदी सरकार ‘पास’

जनतेच्या परीक्षेत मोदी सरकार ‘पास’

=५६ टक्के लोकांनी केली प्रशंसा=
Narendra-modi 5नवी दिल्ली, [२३ मे] – पुढील आठवड्यात एक वर्ष पूर्ण करीत असलेले केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार देशवासीयांच्या कसोटीवर खरे उतरले आहे. देशातील ५६ टक्के नागरिकांनी मोदी सरकारच्या वर्षभरातील कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. पहिल्या वर्षभरातच सरकारने आपल्या बहुतांश वचनांची पूर्तता केली असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
विशेष म्हणजे, आता या क्षणाला देशात पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्यास भाजपा पुन्हा एकदा स्वबळावर स्पष्ट बहुमताने सत्तेवर येईल, असा निष्कर्षही समोर आला आहे. ‘इंडिया टुडे-सिसेरो’ या संस्थेने संयुक्तपणे सर्वेक्षण करून मोदी सरकारविषयी लोकांची मते जाणून घेतली आहेत.
बहुतांश लोकांनी मोदी सरकारच्या कामकाजाची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. २० टक्के लोकांनी अतिशय चांगले, अशा शब्दात सरकारच्या कामकाजाचे वर्णन केले. तर, ३६ टक्के लोकांनी या सरकारने अपेक्षेपेक्षाही चांगले काम केल्याचे मत व्यक्त केले. केवळ १४ टक्के लोकांनीच सरकारची कामगिरी विशेष समाधानकारक नसल्याचे मत नोंदविले आहे.
प्रसारमाध्यमांचे लक्ष केवळ मोदी यांच्यावरच जास्त आहे का, असे विचारले असता ७१ टक्के लोकांनी होकारात्मक आणि १७ टक्के लोकांनी नकारात्मक उत्तर दिले. नरेंद्र मोदी हुकूमशहा आहे, असे तुम्हाला वाटते का, या प्रश्‍नाच्या उत्तरात ४० टक्के लोकांनी नाही असे सांगितले.
एक वर्षाच्या कामगिरीच्या आधारे जर भाजपा पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीला समोरे गेली, तर काय परिणाम येईल, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, कॉंगे्रसच्या मतांच्या टक्केवारीत किंचित वाढ होताना दिसून आली असली, तरी देशात पुन्हा एकदा भाजपाचीच सत्ता येणार असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22656

Posted by on May 24 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1668 of 2453 articles)


=चित्रपट सेनेचे शिंदे जखमी, गोरेगाव फिल्मसिटीतील घटना= मुंबई, [२२ मे] - गोरेगाव फिल्मसिटीच्या गेटवर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार ...

×