Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » जनतेच्या समस्यांचे तत्काळ निवारण करा

जनतेच्या समस्यांचे तत्काळ निवारण करा

=पंतप्रधानांनी घेतला सरकारी बाबूंचा क्लास=
Narendra-Modi3नवी दिल्ली, [२५ मार्च] – जनतेच्या समस्या तत्काळ ऐकून त्यांचे निवारणही तातडीने होईल, असे चित्र महिनाभरात दिसले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चपदस्थ सनदी अधिकार्‍यांना दिले आहेत.
प्रोऍक्टिव्ह गव्हर्नन्स ऍण्ड टाईमली इम्प्लिमेंटेशन अर्थात प्रगती अंतर्गत विविध खात्यांमध्ये दाखल होणार्‍या तक्रारी आणि त्याबाबत उचललेली पावले, या उपक्रमाबाबत पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी पंतप्रधान कार्यालयाला मिळणार्‍या विविध तक्रारींपैकी प्रमुख तक्रार म्हणजे, विविध खात्यांकडून लोकांच्या तक्रारींची दखल न घेणे आणि पुढे कारवाई न होणे, ही असल्याचे ते म्हणाले. त्यानुसार ६० दिवसांच्या आत तक्रारीचे निवारण झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. जमिनीच्या नोंदी आधारशी संलग्न करण्याचे काम वेगाने होण्यासाठीही प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी मध्यप्रदेश, हरयाणा, राजस्थान, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, गुजरात येथील रस्ते, रेल्वे, तेल व ऊर्जा प्रकल्पांचाही यावेळी आढावा घेतला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27576

Posted by on Mar 26 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (572 of 2453 articles)


=भाजपा विधिमंडळ पक्षनेतेपदी निर्मलसिंह,मंगळवारी शपथविधी?= श्रीनगर/जम्मू, [२५ मार्च] - जम्मू-काश्मिरात पुन्हा पीडीपी-भाजपा आघाडीचे सरकार स्थापन होणार हे आता स्पष्ट झाले ...

×