Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » जनतेसाठी मंत्रिपदाचा उपयोग करणार : आठवले

जनतेसाठी मंत्रिपदाचा उपयोग करणार : आठवले

ramdas-athavaleनवी दिल्ली, [५ जुलै] – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालत जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण आपल्या मंत्रिपदाचा उपयोग करू, असे नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सांगितले.
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नवीन महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रपरिषदेत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर प्रथमच एका रिपब्लिकन नेत्याला केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे या संधीचा उपयोग देशातील जनतेच्या कल्याणासाठी करण्याचा माझा निर्धार आहे.
आंबेडकरी चळवळीतील मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मी स्वत:ला मोठा नेता समजत नाही. माझे पाय नेहमीच जमिनीवर असतात, असे स्पष्ट करत आठवले म्हणाले की, मला जे कोणते मंत्रालय मिळेल, त्याचा उपयोग मी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी करणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेला एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करेन, शिवसेनेची भाजपासोबत येण्याची तयारी नसेल तर भाजपा आणि रिपब्लिकन पक्ष या निवडणुका एकत्रित लढवेल आणि मुंबईत महायुतीचा महापौर होईल, असा विश्‍वासही आठवले यांनी व्यक्त केला.
उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुका आमचा पक्ष भाजपासोबत लढवेल, असे स्पष्ट करत आठवले म्हणाले की, हत्ती हे एकेकाळी रिपब्लिकन पक्षाचे निवडणूक चिन्ह होते, सध्या ते बसपाकडे आहे, हे निवडणूक चिन्ह परत मिळवण्यासाठी आम्ही जिद्दीने प्रयत्न करू.
रिपब्लिकन पक्षाचे भाजपात विलीनीकरण करण्याचा प्रश्‍नच उपस्थित होत नाही, असे एका प्रश्‍नावर आठवले यांनी सांगितले.
दलित, आदिवासी आणि ओबीसी यांच्या आरक्षणाला धक्का न लावता अन्य सर्व जातींतील आथिर्र्कदृष्ट्या दुर्बल लोकांना आरक्षण द्यायला आमची हरकत नाही, असेही त्यांनी सांगितले.
जोपर्यंत आठवले केंद्रात मंत्री होत नाही तोपर्यत राज्यात आम्ही मंत्रिपद स्वीकारणार नाही, असा ठराव आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला होता, आता केंद्रात मी मंत्री झाल्यामुळे आमच्या एका कार्यकर्त्याला राज्यात मंत्री बनवा आणि काही महामंडळं आम्हाला द्या, अशी विनंती मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना करणार आहे. आमच्या विनंतीला ते अनुकूल प्रतिसाद देतील, असे आठवले यांनी एका प्रश्‍नावर स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29060

Posted by on Jul 6 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (156 of 2453 articles)


नवी दिल्ली, [५ जुलै] - सुपरस्टार सलमान खानचे वडील सलीम खान यांनी ढाका दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. दहशतवादी जर ...

×