Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ‘जन-धन’ योजना गिनीज बुकात

‘जन-धन’ योजना गिनीज बुकात

=११.५० कोटी खाती पाच महिन्यात=
jan dhan yojnaनवी दिल्ली, [२० जानेवारी] – देशभरातील गरिबांचे बँकेत खाते असावे, या उदात्त हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या आणि अल्पावधीतच प्रचंड यशस्वी ठरलेल्या ‘प्रधानमंत्री जन-धन’ योजनेने थेट ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये धडक दिली आहे. नरेंद्र मोदी सरकारची ही सर्वात मोठी उपलब्धीच मानली जात आहे.
गिनीज बुकाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी आज मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची राजधानी दिल्लीत भेट घेतली आणि सरकारच्या योजनेची नोंद घेणारे प्रमाणपत्र त्यांच्या स्वाधीन केले. सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना राबविल्यानंतर पाच महिन्यांपेक्षाही कमी कालावधीत तब्बल ११.५० कोटी लोकांची बँक खाती उघडण्यात आली.
यावर्षीच्या २६ जानेवारी अर्थातच प्रजासत्ताक दिनापर्यंत किमान साडेसात कोटी लोकांची बँक खाती उघडण्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी २८ ऑगस्ट रोजी ‘जन-धन योजना’ अंमलात आणली होती. सरकारने या योजनेसाठी गरिबांना ‘झिरो बॅलेन्स’ची सुविधा दिली होती. पण, बहुतांश नागरिकांनी १००, २०० आणि ५०० रुपये अशा प्रकारची रक्कम जमा करून आपले खाते उघडले. याचा परिणाम बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी जमा होण्यात झाला. इतक्या कमी वेळेत निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करतानाच, कितीतरी जास्त खाते उघडण्यात आल्याने अखेर गिनीज बुकालाही या योजनेची दखल घ्यावी लागली.
दरम्यान, नक्षलप्रभावित राज्यांमध्येही आम्ही ही योजना प्रभावीपणे राबविणार आहोत. प्रत्येकच नागरिकाला या योजनेत सहभागी करून त्यांना आर्थिक विकासाचा लाभ मिळवून देण्याचा आमचा निर्धार आहे, असे यावेळी अरुण जेटली यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19839

Posted by on Jan 21 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2203 of 2453 articles)


वॉशिंग्टन, [२० जानेवारी] - अमेरिकेच्या प्रथम महिला मिशेल ओबामा यांनी भारतीय वंशाचे अमेरिकन डॉ. प्रणव शेट्टी यांना आमंत्रित केले आहे. ...

×