Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » जपानचा नवा विश्‍वविक्रम

जपानचा नवा विश्‍वविक्रम

=ताशी ६०३ किमी वेगाने धावली रेल्वे=
High-Speed-Train-Japanटोकियो, [२२ एप्रिल] – अतिशय जलद गतीने धावणार्‍या रेल्वेगाड्या आणि बुलेट ट्रेन विकसित करण्यात निष्णात असलेल्या जपानने आता याच क्षेत्रात आणखी एक विश्‍वविक्रम केला आहे. या देशाने मंगळवारी ताशी ६०३ किलोमीटर वेगाने धावणार्‍या गाडीची यशस्वी चाचणी घेतली असून, ही गाडी जगातील सर्वात वेगवान रेल्वे ठरली आहे.
माऊंट फुजीजवळ या गाडीची चाचणी घेण्यात आली. गेल्या आठवड्यातही या गाडीची एक चाचणी झाली होती, त्यावेळी ती ताशी ५९० किलोमीटर या वेगाने धावली होती. त्याचवेळी या गाडीने जागतिक विक्रम मोडीत काढला होता. सेंट्रल जपान रेल्वे या सरकारी कंपनीनेच ही अतिजलद गाडी विकसित केली आहे.
विद्युत चुंबकाद्वारे चालणार्‍या या रेल्वेची टोकियोपासून ८० किमी दूर माऊंट फिजीजवळ चाचणी घेण्यात आली. काही क्षणातच या गाडीने वायुसारखी गती पकडली आणि अवघ्या एका तासात ६०३ किमीचे अंतर पार केले, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. दरम्यान, या रेल्वे गाडीची यशस्वी चाचणी झाली असली, तरी प्रत्यक्षात ती २०२७ मध्येच जपानवासीयांच्या सेवेत येणार आहे. २०२७ मध्ये ही गाडी टोकियो ते नागोया आणि २०४५ मध्ये ती टोकिया ते ओस्का या दरम्यान धावणार आहे. या गाडीसाठी रुळ तयार करण्यात येत असून, त्यासाठी १०० अब्ज डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे, असे हा अधिकारी म्हणाला.
हा हायस्पीड रेल्वे रुळ पूर्णपणे तयार झाल्यानंतर प्रवाशांना प्रवासाचा मुळीच कंटाळा येणार नाही. कारण, त्यांना काही मिनिटातच आपल्या ऐच्छिक स्थळी पोहोचणे शक्य होणार आहे. सध्या जपानमध्ये ६०३ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी किमान दीड तास लागतो. आता अवघ्या एका तासातच हे अंतर पार होणार आहे, असे अधिकार्‍याने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22230

Posted by on Apr 23 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1763 of 2458 articles)


=६३ वरून आला ५३ व्या स्थानावर= नवी दिल्ली, [२२ एप्रिल] - आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करीत भारताने दारिद्र्य ...

×