Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » जपानमध्ये प्रलय, अनेक शहरे पाण्याखाली

जपानमध्ये प्रलय, अनेक शहरे पाण्याखाली

=लाखो लोकांनी छतावर घेतला आश्रय=
japan floodटोकियो, [११ सप्टेंबर] – भूकंप आणि त्सुनामीच्या महाविनाशी लाटा यासारख्या नैसर्गिक संकटांचा नेहमीच सामना करणार्‍या आणि अशा संकटांची सवय झालेल्या जपानला आता अतिशय भीषण अशा जलप्रलयचा सामना करावा लागत आहे. ‘इत्ताऊ’ या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जपानमधील बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून कुठे अतिवृष्टी, तर कुठे मुसळधार पाऊस कोसळत असून, यामुळे अनेक शहरे पाण्याखाली आली आहेत. स्वत:चा जीव वाचविण्यासाठी लाखो लोकांनी उंच इमारतींच्या छतांवर आश्रय घेतला आहे.
निसर्गाच्या प्रकोपाची सवयच झालेल्या जपानवासीयांनी गेल्या ५० वर्षांच्या काळात इतका भयंकर पाऊस अनुभवला नव्हता. पण, अतिशय गतीने आलेले चक्रीवादळ आणि त्याच्या प्रभावातून झालेल्या भीषण पावसामुळे देशाच्या विविध भागांमध्ये जलप्रलयाची स्थिती निर्माण झाली असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. भूकंपानंतर उठणार्‍या त्सुनामीच्या लाटा केवळ किनारपट्टीच्या भागांनाच प्रभावित करतात, पण या पावसाने संपूर्ण जपानलाच तडाखा दिला आहे.
जपानमधील किनुगावा नदीने अतिशय रौद्र रूप धारण केल्याने आणि अन्य नद्याही दुथडी भरून वाहत असल्याने पुराचे पाणी अनेक शहरांमध्ये घुसले. पाण्याचा प्रवाह इतका भीषण होता की, लहान आणि कच्ची घरे कागदाच्या नौकेसारखी वाहून गेली. वृक्षेही उन्मळून पडली आहेत, अशी माहिती सूत्राने दिली.
रस्त्यांवर नेमके किती पाणी साचले, याबाबत अंदाज घेणे शक्य नसल्याने लोकांनी घरांच्या छतांवर आश्रय घेतला आहे. पाण्याचा प्रवाह सातत्याने वाढत असल्याने शहरांमध्ये घुसलेल्या पाण्याची पातळीही वाढत आहे. हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले असून, मिळेल त्या मजबूत वस्तूंना पकडून ते स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. लष्करी व निमलष्करी जवानांनी हेलिकॉप्टर्सच्या मदतीने बचावकार्य हाती घेतले आहे, असे सूत्राने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23766

Posted by on Sep 11 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1490 of 2458 articles)


=तब्बल नऊ वर्षांनंतर निकाल लागला= मुंबई, [११ सप्टेंबर] - ११ जुलै २००६ रोजी मुंबईत लोकल रेल्वेमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी विशेष ...

×