Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » जम्मू-काश्मिरात पीडीपी-भाजपा सरकारचा मार्ग मोकळा

जम्मू-काश्मिरात पीडीपी-भाजपा सरकारचा मार्ग मोकळा

=मेहबुबा मुफ्ती यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट=
jammu-kashmir-map-6नवी दिल्ली, [२२ मार्च] – पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी आज मंगळवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपाचे सरकार स्थापन होण्याची शक्यता पुन्हा बळावली आहे.
मोदी यांच्याशी झालेली आपली भेट सकारात्मक होती, यामुळे आपण समाधानी आहोत, असे मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले. मात्र राज्यात सरकार स्थापण्याच्या संदर्भात कोणतेही ठोस आश्‍वासन त्यांनी दिले नाही. श्रीनगरला गेल्यानंतर आपल्या पक्षाच्या आमदारांशी चर्चा केल्यानंतरच याबाबतची भूमिका जाहीर करू, असे मुफ्ती यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी तुम्हाला कोणते ठोस आश्‍वासन दिले का, या प्रश्‍नावर त्या म्हणाल्या की, जेव्हा तुम्ही पंतप्रधानांशी चर्चा करता, तेव्हा राज्यातील जनतेच्या समस्या सोडविण्याचा मार्ग आपोआपच खुला होतो. पंतप्रधानांना भेटण्यासाठी मेहबुबा मुफ्ती आज सकाळी जम्मू-काश्मीर हाऊसमधून थेट ७ रेसकोर्स रोडवर पोहोचल्या.
गुरुवारी मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली होती, मात्र त्यावेळी राज्यात सरकार स्थापन होण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या चर्चेत कोणतीही प्रगती झाली नव्हती. तशी माहिती नंतर भाजपाचे महासचिव राम माधव यांनी दिली होती. मात्र त्यानंतर लगेच मेहबुबा मुफ्ती यांनी राजधानी दिल्लीत येऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्यामुळे राज्यात सरकार स्थापन होण्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले, असे मानले जात आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आपल्या भूमिकेवर भाजपा ठाम असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकतेच म्हटले होते.
दिल्लीत येण्यापूर्वी मेहबुबा मुफ्ती यांनी सोमवारी सायंकाळी आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावून त्यांच्याशी चर्चा केली होती. या बैठकीला पीडीपीचे नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री हसीब द्राबूही उपस्थित होतेे.
मेहबुबा मुफ्ती दिल्लीतून श्रीनगरला पोहोचल्यावर गुरुवारी पीडीपी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्याची शक्यता आहे. या बैठकीत पीडीपी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी मेहबुबा मुफ्ती यांची निवड होण्याची शक्यता आहे. धुळवडीनंतर राज्यात पीडीपी-भाजपा युतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे ७ जानेवारीला निधन झाले होते. त्यांच्या जागेवर नवे सरकार स्थापन न झाल्यामुळे राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27525

Posted by on Mar 23 2016. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (589 of 2452 articles)


सँटा क्लारा, [२२ मार्च] - संगणकाचा महत्वाचा भाग ‘मदर बोर्ड’ चिप बनविणारी जगातील सर्वात मोठी कंपनी इंटेल कॉर्पोरेशनचे माजी मुख्य ...

×