Home » ज.काश्मीर, झारखंड, ठळक बातम्या, राज्य » जम्मू-काश्मीर, झारखंडचा आज निकाल

जम्मू-काश्मीर, झारखंडचा आज निकाल

=मतमोजणीसाठी कडेकोट सुरक्षा=
jammu-kashmir-and-jharkhand-01नवी दिल्ली, [२२ डिसेंबर] – विधानसभा निवडणुकीच्या सर्व पाचही टप्प्यांमध्ये विक्रमी मतदान झालेल्या जम्मू-काश्मीर आणि झारखंड या दोन राज्यात उद्या मंगळवारी मतमोजणी होणार असून, संपूर्ण देशाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. विशेष म्हणजे, सर्वच जनमत चाचण्यांनी झारखंडची सत्ता भाजपाच्या पदरात टाकली आहे तर, जम्मू-काश्मिरात ३३ जागांसह भाजपा दुसर्‍या स्थानावर राहणार असल्याचे भाकीत केले आहे.
या दोन्ही राज्यांमध्ये पाचही टप्प्यांमध्ये विक्रमी मतदान झाले. दहशतवाद आणि नक्षलवादाची भीती बाजूला सारून मतदारांनी उत्सफूर्त मतदान केले. एकूण पाच टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान झाल्याची नोंद आयोगाने केली आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, जम्मू-काश्मिरात २५ वर्षांच्या काळात प्रथमच इतक्या जास्त मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे केवळ देशाचेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय समुदायाचेही लक्ष निकालांकडे लागले आहे.
उद्या मंगळवारी सकाळी ८ वाजता कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणीला प्रारंभ होईल. तासाभरात निकालाचे कल येणे सुरू होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
झारखंडमध्ये भाजपाला ४५ ते ५२ जागा मिळतील, असा अंदाज सर्वच जनमत चाचण्यांनी वर्तविला आहे. असे झाल्यास या राज्यात प्रथमच एकपक्षीय सरकार येणार आहे. जम्मू-काश्मिरात भाजपाला २८ ते ३३ जागा मिळतील, असा अंदाज असून, पीडीपी किमान ३७ जागांसह सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे. असे असले, तरी निकाल जाहीर झाल्यानंतरच दोन्ही राज्यातील खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19214

Posted by on Dec 23 2014. Filed under ज.काश्मीर, झारखंड, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, झारखंड, ठळक बातम्या, राज्य (2310 of 2452 articles)


=४३ ते ४७ जागा मिळण्याची शक्यता : जनमत चाचणीचा निष्कर्ष= नवी दिल्ली, [२२ डिसेंबर] - झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत आणि जम्मू-काश्मिरात ...

×