Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य अंग

जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य अंग

  • भारताने पाकला पुन्हा ठणकावले
  • अंतर्गत कारभारात ढवळाढवळ नको

unoसंयुक्त राष्ट्रसंघ, [१५ ऑक्टोबर] – संयुक्त राष्ट्रसंघाच्या वेगवेगळ्या व्यासपीठांवर काश्मीर मुद्दा वारंवार उपस्थित करण्याच्या प्रयत्नांबाबत भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले असून, हा एकप्रकारे भारताच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करण्याचाच प्रकार असल्याचे स्पष्ट केले आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि पुढेही राहील, असेही भारताने पाकला ठणकावले आहे.
पाकिस्तानच्या युनोतील राजदूताने केलेल्या वक्तव्याला ‘राईट ऑफ रिप्लाय’चा आधार घेत युनोमधील भारतीय मिशनचे प्रथम सचिव अभिषेक सिंग यांनी पाकला चपराक लगावली. पाकिस्तानने राईट ऑफ रिप्लायचा वापर करण्याऐवजी आत्मपरीक्षणाच्या अधिकाराचा वापर करावा आणि देश कोणत्या मार्गाने जात आहे, याचे सखोल विश्‍लेषण करावे, असा टोला सिंग यांनी लगावला. पाकिस्तानच्या युनोतील राजदूत मलीहा लोधी यांनी युनोची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि युनोच्या कामकाजाबाबत सरचिटणीसांनी सादर केलेल्या अहवालादरम्यान काश्मीर मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता. काश्मीर वादावार शांततापूर्ण तोडगा काढताना या वादाचे एक अंग असलेल्या काश्मिरींशी संवाद आवश्यक आहे, असे लोधी म्हणाल्या होत्या.
भारतीय जम्मू-काश्मीरच्या काही भागावर अवैध कब्जा केलेल्या देशाने अशा गोष्टी करणे खूपच आश्‍चर्यचकित करणारे आहे. काश्मीर वादाशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसून, हा सरळसरळ भारताच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करण्याचा प्रकार आहे, असे सिंग यांनी यावेळी बोलताना सांगितले. गेल्या काही आठवड्यांमध्ये जम्मू-काश्मिरातील नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने अनेकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, यामध्ये भारतीय बाजूला मोठी जीवित हानी झाली आहे. भारतीय लष्कर आणि निमलष्करी दलांनी या चिथावणीखोर कारवायांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे, असेही सिंग यांनी यावेळी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25150

Posted by on Oct 16 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1337 of 2458 articles)


कोटपुतली (राजस्थान), [१५ ऑक्टोबर] - राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि गुलाबी शहर अशी ओळख असलेल्या जयपूरला जोडणारा परंतु रखडलेला महामार्ग येत्या ...

×