Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » जम्मू-काश्मीर सरकारचा तिढा

जम्मू-काश्मीर सरकारचा तिढा

=भाजपा गुरुवारी राज्यपालांना प्रस्ताव सादर करणार=
jugalkishore sharmaजम्मू, [३० डिसेंबर] – जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे निर्माण झालेल्या तिढा सोडवून लोकप्रिय सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी दिलेल्या निमंत्रणाप्रमाणे भाजपाचे शिष्टमंडळ येत्या गुरुवारी त्यांची भेट घेणार आहे.
भाजपाचे शिष्टमंडळ गुरुवार एक जानेवारीला राज्यपाल व्होरा यांची भेट घेऊन आपला औपचारिक प्रस्ताव त्यांना सादर करेल, असे प्रदेश भाजपाध्यक्ष जुगलकिशोर शर्मा यांनी आज मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाजपा सरचिटणीस राम माधव यांच्यासह शर्मा यांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. राज्यात सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान अनेक लोकांच्या भेटीगाठी होत राहतील. मात्र, राज्यपालांसोबत आमची औपचारिक बैठक एक जानेवारीला होईल आणि त्यादिवशी आम्ही त्यांना प्रस्ताव सादर करू, असेही शर्मा यांनी सांगितले.
दरम्यान, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, भाजपाने याचा निषेध केला आहे. असे झाल्यास तो जम्मू-काश्मीरच्या जनतेसोबत विश्‍वासघात ठरेल, असे शर्मा यांनी यावेळी सांगितले. अशी महाआघाडी स्थापन होण्यासंबंधी मला काहीही कल्पना नाही. परंतु, जर असे होत असेल तर तो राज्यातील जनतेसोबत विश्‍वासघात असेल. याचे कारण म्हणजे मतांच्या टक्केवारीत भाजपाची सर्वात जास्त हिस्सेदारी आहे, असेही शर्मा म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19402

Posted by on Dec 31 2014. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (2295 of 2452 articles)


बंगळुरू, [३० डिसेंबर] - भारतातील सिलिकॉन व्हॅली अशी ओळख असलेल्या बंगळुरू शहरातील चर्च स्ट्रीटवर झालेल्या कमी तीव्रतेच्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारण्यासह ...

×