Home » ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य » जयललितांचा आज शपथविधी

जयललितांचा आज शपथविधी

=विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड, पन्नीरसेल्वम् यांचा राजीनामा=
Jayalalitha J.चेन्नई, [२२ मे] – अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता उद्या शनिवारी सकाळी अकरा वाजता पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. अण्णाद्रमुक विधिमंडळ पक्षनेतेपदी शुक्रवारी त्यांची एकमताने निवड झाल्यानंतर सत्तेत परतण्याचा त्यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम् यांनी शुक्रवारी राजीनामा दिला आणि राज्यपालांनी तो तत्काळ प्रभावाने स्वीकारत, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदावर कायम राहण्याचे निर्देश दिले. सोबतच, जयललिता यांना सरकार स्थापन करण्याचे औपचारिक निमंत्रणही दिले.
शुक्रवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास पन्नीरसेल्वम् यांनी राजभवनात जाऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. राज्यपाल के. रोसय्या यांच्या मुख्य सचिवांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकार केला आहे. त्यानंतर काही वेळातच जयललिता यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला. तो स्वीकारून राज्यपालांनीही जयललिता यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आणि शपथ घेणार्‍या मंत्र्यांची आणि त्यांना सोपविण्यात येणार असलेल्या खात्यांची यादीही राजभवनाकडे सादर करण्यास सांगितले आहे.
तत्पूर्वी, अण्णाद्रमुक विधिमंडळ पक्षाच्या शुक्रवारी सकाळी झालेल्या बैठकीत जयललिता यांची पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. उद्या शनिवारी सकाळी अकरा वाजता जयललिता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, अशी माहिती त्यांच्या पक्षातील उच्चस्तरीय सूत्राने दिली.
कोट्यवधी रुपयांच्या बेहिशेबी संपत्तीप्रकरणी बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जयललिता यांना दोषी ठरवून पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. या निकालामुळे त्यांची आमदारकी आपोआपच रद्द झाली आणि त्यांना मुख्यमंत्रिपदाचाही राजीनामा द्यावा लागला होता. त्यांचे सर्वात विश्‍वासू समजले जाणारे पन्नीरसेल्वम् यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली होती. गेल्या ११ मे रोजी बंगळुरू उच्च न्यायालयाने जयललिता यांना निर्दोष मुक्त केले होते. यापूर्वी २००१ मध्येही तान्सी घोटाळ्यात जयललिता यांना शिक्षा झाल्यानंतर पन्नीसेल्वम् यांच्याकडेच मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली होती, विशेष!

Short URL: https://vrittabharati.in/?p=22625

Posted by on May 22 2015. Filed under ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य (1676 of 2452 articles)


=मुख्यमंत्र्यांची घोषणा , नांदगाव पेठ औद्योगिक क्षेत्रात टेक्सस्टाईल पार्कचे उद्घाटन= अमरावती, [२१ मे] - राज्यात सर्वाधिक कापूस उत्पादन करणार्‍या आठ ...

×