Home » ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य » जयललितांना सुप्रीम कोर्टाचा झटका

जयललितांना सुप्रीम कोर्टाचा झटका

=कर्नाटक हायकोर्टाच्या निकालाचा मार्ग मोकळा, विशेष सरकारी वकिलाची नियुक्तीही बेकायदेशीर=
jaylalitaनवी दिल्ली, [२७ एप्रिल] – बेहिशेबी संपत्तीप्रकरणी दोषी ठरवून चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी जोरदार झटका दिला. दोषी ठरविण्याविरोधात त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर नव्याने सुनावणीची काहीच गरज नाही, असे स्पष्ट करताना कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणी दिलेल्या निकालावर आणण्यात आलेली स्थगितीही सर्वोच्च न्यायालयाने उठविली. यामुळे जयललितांपुढील अडचण आणखी वाढणार आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाने जयललिता यांना बेहिशेबी संपत्ती प्रकरणी दोषी ठरवून चार वर्षांचा कारावास आणि आर्थिक दंड ठोठावला होता. या निर्णयाला जयललिता यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सोबतच, द्रमुक नेते के. अनबाझगन यांनी या प्रकरणात तामिळनाडूची भूमिका मांडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विशेष सरकारी वकिलाच्या वैधतेला आव्हान दिले होते. या पूर्वीच्या सुनावणीत न्या. मदन बी. लोकूर आणि न्या. आर. बानुमती यांच्या निकालात मतभिन्नता दिसून आल्यानंतर हे प्रकरण सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्याकडे सोपविण्यात आले व सुनावणीसाठी विशेष पीठ गठित करण्यात आले होते.
या विशेष पीठाने आज सोमवारी आपला निकाल जाहीर करताना जयललितांच्या आव्हान याचिकेवर नव्याने सुनावणी करण्याची मुळीच गरज नसल्याचे स्पष्ट केले आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालावर घालण्यात आलेली बंदीही उठविली. जयललिता सध्या जामिनावर असून, सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात त्यांच्या अंतरिम जामिनाची मुदतही वाढविली होती. सोबतच, तामिळनाडूचे प्रतिनिधित्व करणार्‍या विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती बेकायदेशीर असून, तामिळनाडू सरकारला कर्नाटक उच्च न्यायालयातील सुनावणीसाठी आपला सरकारी वकील नियुक्त करण्याचा अधिकारच नाही. कायद्याच्या चौकटीत अशा प्रकारच्या नियुक्तीला मुळीच स्थान नसल्याचे स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22321

Posted by on Apr 28 2015. Filed under ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य (1743 of 2452 articles)


काठमांडू, [२७ एप्रिल] - नेपाळमध्ये भूकंपाच्या प्रलयातील मृतांचा आकडा प्रत्येक तासाला वाढतच आहे. इमारतीच्या ढिगार्‍याखाली अनेक लोक गाडले गेले असून ...

×