Home » क्रीडा, ठळक बातम्या » जर्मनी उपांत्यपूर्व फेरीत

जर्मनी उपांत्यपूर्व फेरीत

= फ्रान्सशी लढत होणार=
पोर्टो ऍलोगो, [१ जुलै] – विश्‍व करंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीने प्रवेश केला आहे. रात्री उशीरा झालेल्या रंतदार लढतीत जर्मनीने अल्जेरियाचा २-१ गोलने पराभव केला. सामन्याचा निकाल अतिरिक्त वेळेतील खेळात लागला.
अगोदर झालेल्या सामन्यात फ्रान्सला नायजेरियाने जबरदस्त व्हान दिले होते. शेवटी फ्रान्सने २-० गोलने विजय मिळविल्यानंतर संपूर्ण विश्‍वातील फुटबॉल दर्शकांचे लक्ष लागले ते जर्मनी व अल्जेरिया या लढतीकडे.
अपेक्षेनुसार संपूर्ण वेळेत दोन्ही संघ बरोबरीत सुटल्याने रेफ्रीने अतिरिक्तवेळेपर्यंत सामना खेळविला. त्यात खेळातील ९२ व्या मिनिटाला चेल्सीचा दिग्गज खेळाडू आंद्रे शुर्ले याने गोल झळकवून जर्मनीला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी खेळातील ११९ व्या मिनिटापर्यंत कायम होती. पण खेळातील अंतिम क्षणाला म्हणजे १२० व्या मिनिटाला जर्मनीच्या मेसुत ओजिल याने गोल करून संघाला २-० ने मोठी आघाडी मिळवून दिली. जर्मनी उपांत्यपूर्व फेरीत दाखल झालाच होता. दर्शकही जल्लोशात बुडाले होते. जर्मनी मोठा विजय मिळविणार असल्याने राखीव खेळाडूही आनंद साजरा करण्यासाठी साईड लाईनवर आले होते. त्यातच अतिरिक्त वेळेतील इन्ज्युरी टाइमचा खेळाचा इशारा देण्यात येताच अल्जेरियाच्या अब्दुल मोइमेन याने गोल करून संघाला १-२ वर आणले. याच क्षणी सामना पुन्हा रंगतदार अवस्थेत पोचला होता.
विश्‍व करंडकाच्या इतिहासात अल्जेरिया प्रथमच अंतिम १६ संघात पोचला होता. त्यामुळे त्या संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तीन वेळचा विश्‍व विजेता जर्मनीला या संघाने चांगलेच झुंजविले होते. शेवटी इन्ज्युरी टाइम समाप्त होताच जर्मनीने २-१ गोल फरकाने विजय मिळवित अंतिम आठ संघात धडक दिली.
या सामन्यात अल्जेरियाच्या स्पोर्टिंग लिस्बनचा खेळाडू इस्लाम सिलवानी याने पूर्वार्धातील खेळातच गोल केला होता. पण दक्ष लाईन रेफ्रीने तो गोल ऑफ साईड दिला होता. यावरूनच अल्जेरियाने जर्मनीवर प्रचंड दबाव आणला होता हे दिसून येत होते.
रोजे असताना अल्जेरिया (अधिकांश मुस्लीम खेळाडू) या संघातील खेळाडूंसंदर्भात बरीच चर्चा उठली होती. अल्जेरियाचा गोलरक्षक राइस मखोई याने देखणे रक्षण करीत जर्मनीच्या टोनी क्रुस व मारिया शोल्टज यांनी रचलेला जबरदस्त हल्ला अप्रतिमरित्या परतवून लावला होता. ही अल्जेरियाची जमेची बाजू ठरली होती. पण नशीबाची साथ त्यांना मिळू शकली नाही.
लढत बरोबरीत असल्यामुळे जर्मनीचे प्रशिक्षक फार बेचैन झाले होते. त्यांनी जलपानानंतरच्या खेळात गोएत्झे याच्या जागेवर शुर्ले याला बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरविले व त्यानेच जर्मनीला तारले.
त्याने खेळातील ४८ व्या मिनिटाला मारलेला चेंडू गोलस्तंभाच्या बाजूने निघून गेला होता. या सामन्यात विश्‍वविख्यात मुल्लेर यालाही गोल करण्यात यश मिळाले नाही. खेळ संपण्यास केवळ दहा मिनिटे उरली असताना मुल्लेरने हेडिंगवर चेंडू गोलजाळ्यात फेकला होता, पण दक्ष गोलरक्षकाने तो गोल चपळाईने वाचविला होता.
उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्स व जर्मनी या संघात लढत होणार आहे. दोन्ही संघ बलवान आहेत. १९८६ मध्ये याच दोन संघात विश्‍व करंडकाचा उपांत्य सामना झाला होता व जर्मनीने फ्रान्सवर विजय नोंदविला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=13862

Posted by on Jul 2 2014. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, ठळक बातम्या (2406 of 2455 articles)


साओ पाउलो, [१ जुलै] - यंदाची ब्राझीलमधील फिफा फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धा एक अब्ज पोस्ट, लाइक आणि कमेंट्‌स यामुळे फेसबुकवर जोरदार ...

×