Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » जर्मन बेकरी: हिमायत बेगला फाशीऐवजी जन्मठेप

जर्मन बेकरी: हिमायत बेगला फाशीऐवजी जन्मठेप

himayat-baigमुंबई, [१७ मार्च] – पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी मिर्झा हिमायत इनायत बेग याला ठोठावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. १० पैकी ९ आरोपांमधूनही न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केले आहे. एका आरोपात तो दोषी आहे, यावर शिक्कामोर्तब करत मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
१३ फेबु्रवारी २०१० रोजी पुण्यातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटात १७ जण ठार तर ५८ जण जखमी झाले होते. याप्रकरणी हिमायत बेगला सप्टेंबर २०१० रोजी अटक झाली होती. २०१३ मध्ये पुणे सत्र न्यायालयाने बेगला बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेला हिमायतने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठानं निकाल दिला असून हिमायतला फाशीऐवजी जन्मठेप सुनावली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27392

Posted by on Mar 18 2016. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (632 of 2452 articles)


नवी दिल्ली, [१७ मार्च] - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा बुधवारी संध्याकाळी संपला. अधिवेशनाचा पहिला टप्पा सकारात्मक ठरला असून २३ ...

×