Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांना पाण्याचे नोबेल

जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांना पाण्याचे नोबेल

RAJENDRA_SINGH_RANAमुंबई, [२१ मार्च] – देशातील प्रसिद्ध जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांच्या कामाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान करण्यात आला आहे. पाण्याच्या क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तीला दिला जाणारा ‘स्टॉकहोम वॉटर प्राईज’ हा सन्मानाचा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराची पाण्याचे नोबेल अशी ओळख आहे.
राजेंद्रसिंह राणा यांना स्वीडनमध्ये येत्या २६ ऑगस्ट रोजी हे पारितोषिक दिले जाणार आहे. राजस्थानसारख्या टंचाईग्रस्त भागात राजेंद्रसिंह यांनी पाण्याच्या क्षेत्रात मोठं काम केलं आहे. हजारो जोहड निर्माण करून त्यांनी या भागातलं चित्र बदलण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय अलीकडच्या काळात त्यांनी नद्यांच्या पुनरुज्जीवनाचंही कार्य हाती घेतलं आहे.
याआधी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे आणि बिंदेश्‍वर पाठकर या भारतीयांना हा पुरस्कार मिळाला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21638

Posted by on Mar 21 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1864 of 2453 articles)


=कोळसा विधेयक राज्यसभेत मंजूर, कॉंग्रेस, डावे वगळता सर्वच पक्षांची सरकारला साथ= नवी दिल्ली, [२० मार्च] - खाण आणि खनिज विकास ...

×