Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » जागतिक तापमान तीन अंश सेल्सियसने वाढणार

जागतिक तापमान तीन अंश सेल्सियसने वाढणार

global-warming1लंडन, [२८ ऑक्टोबर] – प्रचंड औद्योगिकीकरण, अफाट वृक्षतोड, कार्बन उत्सर्जन, नागरीकरण, खनिज उत्खनन या व अन्य कारणांमुळे ग्लोबल वॉर्मिंग अर्थात जागतिक तापमानवाढीचा गंभीर प्रश्‍न आवासून उभा राहिला आहे. २०३० पर्यंत तापमानवाढ नियंत्रित ठेवण्याचे प्रयत्न सर्वच देश करीत असतानाच जागतिक तापमानात जवळजवळ तीन अंश सेल्सिअसने वाढ होणार असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे.
युरोपियन कमिशनच्या संयुक्त संशोधन केंद्रातर्फे या संदर्भात संशोधन करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक ‘क्लायमेट चेंज’ संमेलनात जगातील १५५ देश सहभागी झाले होते. वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करण्याचे आश्‍वासन या देशांनी दिले होते. या पार्श्‍वभूमीवर जागतिक तापमानात तीन अंश सेल्सियसने वाढ होणार असल्याच्या शक्यतेने या प्रश्‍नावर पुन्हा नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे. जागतिक हवामान धोरणानुसार तापवानवाढ रोखण्यासाठी संबंधित १५५ देशांनी काय प्रयत्न केले, याचा लेखाजोखा या संमेलनात मांडण्यात आला. मात्र, विकसित आणि विकसनशील देशांनी कार्बन उत्सर्जनावर प्रभावी उपाययोजना केल्या नसल्यामुळेच जागतिक तापमानवाढीचे संकट ओढवल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्यावेळी पेरूची राजधानी लिमा येथे या विषयावर पार पडलेल्या जागतिक संमेलनात तापमानवाढीवर चर्चा होऊन सर्व देशांना आपले राष्ट्रीय धोरण सादर करण्याबाबत सांगण्यात आले होते. आता याचा दुसरा टप्पा म्हणून तापमानवाढ रोखण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना त्या-त्या देशांनी केल्या याची माहिती डिसेंबर २०१५ मध्ये पॅरिस येथे होणार्‍या जागतिक परिषदेत द्यायची आहे. विशेष म्हणजे कुठल्याही आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थेचे (जागतिक बँक व अन्य) सहकार्य न घेता संबंधित राष्ट्रांना स्वखर्चानेच उपाययोजना हाती घ्यायच्या आहेत. त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान किंवा उपकरणे स्वत:च विकसित करायची आहेत. मात्र, २०३० पर्यंत तापमानवाढ नियंत्रित ठेवण्यासाठी ज्या गतीने आणि परिणामकारक पद्धतीने प्रयत्न होण्याची गरज होती, तेवढे झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जगातील सर्वच राष्ट्रांनी इच्छाशक्ती दाखविल्यास या प्रश्‍नावर तोडगा निघू शकतो. डिसेंबरच्या पॅरिस परिषदेपूर्वी सर्व सहभागी देशांना आपल्या प्रयत्नांची गती वाढवावी लागणार आहे. प्रभावी उपाययोजना न आखल्यास पृथ्वीवासीयांना भविष्यात तीव्र उष्णतेचा सामना करावा लागू शकतो.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25383

Posted by on Oct 29 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (1267 of 2458 articles)


काठमांडू, [२८ ऑक्टोबर] - सत्तारूढ सीपीएन-युएमएल पार्टीच्या वरिष्ठ नेत्या आणि उपाध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांची आज बुधवारी नेपाळच्या राष्ट्रपती म्हणून निवड ...

×