Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » जातीय सलोखा बिघडविणार्‍यांची गय नाही

जातीय सलोखा बिघडविणार्‍यांची गय नाही

=सरकारचा राज्यसभेत इशारा=
rajyasabhaनवी दिल्ली, [४ मार्च] – देशातील जातीय सलोखा बिघडविण्याचा कोणताही प्रयत्न कदापि खपवून घेतला जाणार नाही. अशा प्रकरणांमध्ये दोषी आढळून येणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा सरकारतर्फे आज बुधवारी राज्यसभेत देण्यात आला.
जातीय सलोख्याचे वातावरण विस्कळीत करणारी व्यक्ती कोणीही असो, त्याची मुळीच गय केली जाणार नाही. देशात जातीय सलोखा प्रस्थापित करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे केद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सभागृहात एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.
देशात जातीय तणावाच्या काही घटना घडल्या आहेत. पण, त्यावरून देशात जातीय सलोखा मजबूतच नाही, असा अर्थ काढता येणार नाही. अशा घटना रोखण्यासाठी सरकार सज्ज आहे, असे ते म्हणाले. यावेळी गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी ऑक्टोबर २०१४ पासून देशात झालेल्या जातीय हिंसाचाराची माहितीही दिली. ऑक्टोबर ते डिसेंबर २०१४ या काळात देशातील जातीय हिंसाचाराच्या घटना कमी होत असल्याचेच दिसून आले आहे, असे ते म्हणाले.
ऑक्टोबर महिन्यात अशा ७२ घटना घडल्या होत्या. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ४९ आणि डिसेंबरमध्ये केवळ ३३ घटनांचीच नोंद झाली होती. तथापि, यावर्षीच्या जानेवारीत जातीय हिंसाचाराच्या ७२ घटना घडल्या, असे त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21109

Posted by on Mar 5 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1976 of 2453 articles)


=विविध मंत्रालयातील प्रतिनिधींचा समावेश= नवी दिल्ली, [४ मार्च] - पहिल्या टप्प्यात अजमेर, अलाहाबाद आणि विशाखापट्टणम् या शहरांचा ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ...

×