जात, धर्माच्या आधारे भेदभाव नाही : राजनाथ
Friday, February 6th, 2015नवी दिल्ली, [५ फेब्रुवारी] – भाजपाप्रणीत रालोआचे केंद्र सरकार जात आणि धर्माच्या आधारे कोणताही पक्षपात कदापि सहन करणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिली असून, चर्च आणि इतर धार्मिक स्थानांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे निर्देश दिल्ली पोलिसांना दिले आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीतील चर्चवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ख्रिश्चनांच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी राजनाथसिंह यांची त्यांच्या नॉर्थ ब्लॉक येथील कार्यालयात भेट घेतली आणि मागण्यांचे निवेदन सादर केले. दिल्लीतील चर्चवर झालेल्या हल्ल्यांची निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश आधीच देण्यात आले आहेत, अशी माहिती राजनाथसिंह यांनी शिष्टमंडळातील प्रतिनिधींना दिली. जात, वर्ण किंवा धर्म याआधारे कोणताही भेदभाव सरकार कदापि सहन करणार नाही, असे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले, असे गृह मंत्रालयातील अधिकार्याने सांगितले. चर्च आणि इतर धार्मिक ठिकाणांच्या सुरक्षेसाठी दिल्लीच्या पोलिसांनी योग्य ती उपाययोजना करावी, असेही निर्देश राजनाथसिंह यांनी दिले.
Short URL: https://vrittabharati.in/?p=20326

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!