Home » ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य » जावईबापूंकडे जमीन किती?

जावईबापूंकडे जमीन किती?

=हरयाणा सरकारने मागविला अहवाल=
Robert Vadraनवी दिल्ली, [२२ नोव्हेंबर] – कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी कमाल भू मर्यादा कायद्यांतर्गत नमूद असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त जमीन संपादित केली आहे का? याबाबतचा अहवाल हरयाणा सरकारने गुडगाव, मेवात, फरिदाबाद आणि पालवाल येथील उपायुक्तांकडून मागविला आहे. यामुळे रॉबर्ट वढेरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
याविषयी सप्टेंबर महिन्यातच भूसंपादन विभागाच्या महासंचालकांनी उपायुक्तांना पत्र दिल्यानंतर भाजपा सरकारने तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. वरिष्ठ सनदी अधिकारी अशोक खेमका यांनी गेल्या ऑगस्टमध्ये महासंचालकांना पत्र लिहून भूसंपादन विभागाने पुरविलेल्या नोंदींची सविस्तर माहिती दिली होती. त्यानुसार, वढेरा यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या नावे हरयाणात कमाल मर्यादेपेक्षा जास्त जमीन असल्याचा मुद्दा पुढे आला होता. या पत्रामुळेच वढेरा यांच्या अडचणी वाढल्या होत्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=18464

Posted by on Nov 23 2014. Filed under ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य (2338 of 2452 articles)


=मुंबई आयआयटीतील शास्त्रज्ञांचे यश= नवी दिल्ली, [२१ नोव्हेंबर] - मुंबईतील आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी किडनीग्रस्त रुग्णांसाठी एक विशेष पडदा तयार केला असून ...

×