Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » जीएसटीमुळे करांमधील गुंतागुंत संपणार : जेटली

जीएसटीमुळे करांमधील गुंतागुंत संपणार : जेटली

arun-jaitley2मुंबई, [५ जुलै] – गुड्‌स ऍण्ड सर्व्हिस टॅक्स अर्थातच जीएसटी या नव्या कररचनेमुळे वेगवेगळ्या करांमुळे निर्माण होणारी गुंतागुंत संपुष्टात येऊन व्यापारी वर्गाला सामना कराव्या लागणार्‍या अडचणी दूर होणार आहेत, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीआयएटी) या व्यापारी संघटनेच्या एका शिष्टमंडळाने राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांच्या नेतृत्वात शनिवारी अरुण जेटली यांची भेट घेतली आणि व्यापार्‍यांना भेडसावणार्‍या अडचणींची माहिती त्यांना दिली.
प्रस्तावित जीएसटीमुळे कररचना खूपच सोपी होणार आहे. त्यामुळे सध्याच्या कररचनेमुळे व्यापार्‍यांना अडचणीच्या ठरणार्‍या गोष्टी दूर होतील असे आश्‍वासन अर्थमंत्री जेटली यांनी आम्हाला दिले, अशी माहिती खंडेलवाल यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
उत्पादन ते वितरण यादरम्यान वेगवेगळ्या टप्प्यावर आकारण्यात येणार्‍या करांमुळे निर्माण होणारी गुंतागुंत आणि कररचनेत असलेला विविध संस्थांचा सहभाग संपुष्टात येणार आहे. या अडचणी दूर करण्याच्या उद्देशानेच जीएसटी लागू करण्यात येणार आहे, असेही जेटली यांनी सांगितल्याचे खंडेलवाल पुढे म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23292

Posted by on Jul 7 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1577 of 2453 articles)


ढाका, [६ जुलै] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या महिन्यातील बांगलादेश दौर्‍यात झालेल्या ऐतिहासिक सीमा करारानुसार येत्या ३१ जुलैपूर्वी आपापल्या ...

×