Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » जीतनराम मांझी यांचा नवा पक्ष स्थापन

जीतनराम मांझी यांचा नवा पक्ष स्थापन

JITAN_RAM_MANJHIपाटणा, [८ मे] – जदयुचे निलंबित नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी आज शुक्रवारी स्वत:चा नवा राजकीय पक्ष स्थापन केला. ‘हिंदुस्थानी अवाम मोर्चा’ असे त्यांच्या नव्या पक्षाचे नाव असून, याच वर्षीच्या अखेरीस राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष सर्वच २४३ जागा लढविणार असल्याचेही मांझी यांनी जाहीर केले.
भरगच्च पत्रपरिषदेत मांझी यांनी आपल्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. तथापि, तांत्रिक कारणामुळे या पक्षाच्या यादीत मांझी आणि जदयुच्या अन्य १७ बंडखोर नेत्यांपैकी एकाचेही नाव आले नसल्याने सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
नव्या पक्षाच्या नोंदणीसाठी आम्ही लवकरच निवडणूक आयोगाकडे अर्ज सादर करणार आहोत. आमच्या पक्षाच्या ध्वजाला वर आणि खाली हिरवा तसेच मधात पांढरा रंग राहणार आहे. त्यावर ‘एचएएम’ असे लिहिले राहील, असे मांझी यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22443

Posted by on May 9 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1719 of 2452 articles)


=वृत्तवाहिन्यांचा महापूर, पण.... : अर्थमंत्री अरुण जेटली= नवी दिल्ली, [८ मे] - देशात वृत्तवाहिन्यांचा महापूर आलेला आहे. पण, वस्तुस्थितीवर आधारित ...

×