Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » जेएनयूचे चीफ प्रॉक्टर कृष्णकुमार यांचा राजीनामा

जेएनयूचे चीफ प्रॉक्टर कृष्णकुमार यांचा राजीनामा

=रबर स्टॅम्प म्हणून वापरल्याचा आरोप=
jnu chief proctor krishna kumarनवी दिल्ली, [५ मार्च] – जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) परिसरात ९ फेब्रुवारी रोजी झालेली घटना प्रशासनाने ज्या पद्धतीने हाताळली त्यामुळे नाराज होऊन विद्यापीठाचे चीफ प्रॉक्टर कृष्णकुमार यांनी २९ फेब्रुवारीला आपल्या पदाचा राजीनामा दिला.
प्रशासनाने कृष्णकुमार यांच्या जागी स्कूल ऑफ एन्व्हायर्नमेंटल सायन्सेसचे ए. पी. डिमरी यांची नियुक्ती केली आणि डिमरी यांनी १ मार्चपासून नव्या पदाची जबाबदारी स्वीकारली.
विद्यापीठाकडून उपलब्ध झालेल्या दस्तावेजांनुसार राष्ट्रविरोधी घोषणाबाजीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ११ फेब्रुवारी रोजी प्रॉक्टोरियल कमिटीची स्थापना करण्यात आली होती. परंतु, अवघ्या काही तासातच या समितीच्या ऐवजी उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याची घोषणा करण्यात आली. नव्या समितीमध्ये प्रोफेसर राकेश भटनागर, प्रोफेसर एचबी बोहिदार आणि प्रोफेसर सुमन के. धार यांचा समावेश करण्यात आला.
९ फेब्रुवारीला साबरमती व गंगा वसतिगृहाजवळ घडलेल्या घटनेच्या चौकशीसाठी कुलगुरूंनी या तीन जणांचा समावेश असलेली उच्चस्तरीय समिती स्थापन केली. आधी स्थापन करण्यात आलेल्या प्रॉक्टोरियल कमिटीची जागा ही समिती घेईल, असे यासंबंधीच्या दस्तावेजांवरून स्पष्ट होते.
विद्यापीठाच्या नियमावलीनुसार विद्यार्थी आणि शिक्षकांसंबंधीची सर्व प्रकरणं प्रॉक्टर हाताळतात. परंतु, या अपमानजनक वागणुकीनंतर कन्हैया कुमार, अनिर्बान भट्टाचार्य, श्‍वेता राज, उमर खालिद, अनंत प्रकाश, रमा नागा, ऐश्‍वर्या अधिकारी व आशुतोष कुमार या आठ विद्यार्थ्यांच्या निलंबन पत्रावर कृष्णकुमार यांना स्वाक्षरी करण्यास भाग पाडले केले. कुमार यांचा फक्त रबर स्टॅम्प म्हणून वापर करण्यात आला, असे सूत्राने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27034

Posted by on Mar 6 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (761 of 2452 articles)


नवी दिल्ली, [५ मार्च] - संरक्षण खर्च कमी करण्याच्या दृष्टीने भारतीय लष्कराच्या संख्येत काही प्रमाणात कपात करण्याचे संकेत संरक्षणमंत्री मनोहर ...

×