Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » जेएनयूतील देशविरोधात बोलणारे विद्यार्थी हिरो नाहीत

जेएनयूतील देशविरोधात बोलणारे विद्यार्थी हिरो नाहीत

=अनुपम खेर यांची घणाघाती टीका=
anupam kher2नवी दिल्ली, [१९ मार्च] – देशविरोधात बोलणारे जेएनयूतील विद्यार्थी जामिनावर सुटल्यानंतर असे दणाणून सेलिब्रेशन करीत आहेत, जणू काही ते ऑलिम्पिक मेडलच जिंकून आले आहेत, अशी घणाघाती टीका करताना, कन्हैया, उमर खालिदने देशासाठी काय केले, असा स्पष्ट सवाल ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी केला आहे.
आपल्या ‘बुद्धा इन ट्राफीक जाम’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी विद्यापीठात आले असता त्यांनी या विद्यार्थ्यांचा सडकून समाचार घेतला.
देशविरोधी नारेबाजी प्रकरणात जामिनावर सुटलेल्या कन्हैय्या कुमारवर टीका करताना खेर म्हणाले की, तो काही ऑलिम्पिकमधून मेडल जिंकून आलेला नाही, त्याचं इतके भव्य स्वागत कशाला, जो देशविरोधात बोलतो, त्याला आपण हिरो कसे काय बनवू शकतो, तो काही सचिन, सायना किंवा हनुमंतअप्पा नाही, अशी परखड टीका त्यांनी केली. तसेच देशातील चुकीच्या गोष्टीवर टीका करण्याऐवजी देशासाठी तुम्ही काय केले, हा खरा सवाल आहे, असे ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27471

Posted by on Mar 20 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (607 of 2452 articles)


=‘विराट’ विजय= कोलकाता, [१९ मार्च] - सध्या सुपर फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीचे शानदार अर्धशतक (नाबाद ५५) आणि त्याने युवराजसोबत चौथ्या ...

×