Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » ‘जेएनयू’तील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष अटकेत

‘जेएनयू’तील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष अटकेत

kanhaiya Kumar jnuनवी दिल्ली, [१३ फेब्रुवारी] – संसद हल्ल्याचा मास्टरमाईंड अफजल गुरू याला फाशी दिल्याच्या निषेधार्थ जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देणार्‍या जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हेय्या कुमारला पोलिसांनी अटक केली आहे.
या आंदोलनात सहभागी इतर विद्यार्थ्यावरही कडक कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. २०१३ साली संसद हल्ल्यात सहभाग असल्यावरून अफजल गुरूला फासावर लटकवण्यात आले होते. याच अफजल गुरूच्या समर्थनार्थ मंगळवारी जेएयू विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी घोषणा केली होती. यावेळी त्यांनी देशविरोधी घोषणाही केल्या होत्या. घोषणाबाजी करणार्‍या २० विद्यार्थ्यांची यादी पोलिसांनी जाहीर केली आहे. या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26837

Posted by on Feb 14 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (825 of 2452 articles)


=राजनाथसिंह यांचा इशारा, निष्पाप लोकांना त्रास होणार नाही= नवी दिल्ली, [१३ फेब्रुवारी] - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील घटनेवरून राजकारण सुरू झाले ...

×