Home » ज.काश्मीर, झारखंड, ठळक बातम्या, राज्य » जेटलींकडे ‘मिशन काश्मीर’

जेटलींकडे ‘मिशन काश्मीर’

=नड्डा, सहस्रबुद्धे झारखंडचे निरीक्षक=
arun-jaitley_06नवी दिल्ली, [२४ डिसेंबर] – स्पष्ट बहुमत प्राप्त झालेल्या झारखंडमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने आज बुधवारी पक्षाचे सरचिटणीस आणि आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा तसेच उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती केली. तर, दुसर्‍या मोठ्या पक्षासह ‘किंगमेकर’ ठरलेल्या जम्मू-काश्मीरची महत्त्वाची जबाबदारी भाजपाने केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि सरचिटणीस अरुण सिंग यांच्यावर सोपविली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि अन्य वरिष्ठ नेत्यांचा समावेश असलेल्या भाजपा संसदीय मंडळाची आज बुधवारी दुपारी बारा वाजता बैठक झाली. दोन्ही राज्यांमधील निवडणूक निकालांचा बैठकीत आढावा घेण्यात आला. या बैठकीत जेटली आणि अरुण सिंग यांच्यावर जम्मू-काश्मीरची, तर नड्डा आणि सहस्रबुद्धे यांच्यावर झारखंडची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला.
झारखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत असल्याने तिथे सरकार स्थापन करण्याच्या मार्गात कुठलीही अडचण नाही. पण, जम्मू-काश्मिरात २५ जागांसह भाजपा दुसरा मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. या राज्यात सरकार स्थापन करण्याची आणि मुख्यमंत्री देण्याची आमची इच्छा आहेे. आमचे सर्वच पर्याय खुले आहेत. आमच्या पक्षाची दारे सर्वच राजकीय पक्षांसाठी खुली आहेत, असे नड्डा यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, काही अपक्षांनी भाजपाला पाठिंबा दिला असून, भाजपाकडे सध्या ३१ सदस्यांचे बळ आहे, असा दावा सूत्राने केला आहे. काश्मिरात आम्ही सर्वच शक्यता पडताळून पाहणार आहोत. या सर्व प्रक्रियेला तीन ते चार दिवस लागतील. याच वर्षीच्या अखेरपर्यंत निर्णय झालेला असेल, असे सूत्रांचे मत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19258

Posted by on Dec 25 2014. Filed under ज.काश्मीर, झारखंड, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, झारखंड, ठळक बातम्या, राज्य (2306 of 2452 articles)


=१४ दिवसांचा फर्लो मंजूर= पुणे, [२४ डिसेंबर] - मार्च १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेत बेकायदेशीरपणे शस्त्र जवळ बाळगल्याबद्दल पाच वर्षांच्या ...

×