Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » जेटली आज सादर करणार अर्थसंकल्प

जेटली आज सादर करणार अर्थसंकल्प

=शेतकरी, गुंतवणूकदारांना दिलासा मिळण्याची शक्यता=
Arun Jaitley9नवी दिल्ली, [२८ फेब्रुवारी] – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली उद्या सोमवारी २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठीच अर्थसंकल्प सादर करणार असून, जेटलींच्या सूटकेसमधून नेमके काय बाहेर पडते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
अरुण जेटली यांचा हा तिसरा अर्थसंकल्प असून, सार्वजनिक खर्च वाढविण्यासाठी इतर स्रोत जमवितानाच आर्थिक विकासाला चालना देण्याचे मोठे आव्हान जेटलींसमोर आहे. गेल्या काही वर्षांपासून देशाच्या अनेक भागात निर्माण होणार्‍या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर एकीकडे सामाजिक कल्याणाच्या योजनांवर अधिक खर्च करणे आणि दुसरीकडे आर्थिक सुधारणांना गती देण्यासाठी विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे, अशी दुहेरी कसरत जेटलींना करावी लागणार आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमुळे सरकारी कर्मचार्‍यांच्या वेतनात होणारी वाढ लक्षात घेता सरकारच्या तिजोरीवर १.०२ लाख कोटींचा भार पडणार असल्याने जेटलींच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. या पार्श्‍वभूमीवर पुढील वर्षी वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) ३.५ टक्के ठेवण्याचे आपले लक्ष्य गाठण्यासाठी जेटली नेमके काय करतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
चार वर्षात कॉर्पोरेट कर ३० टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे आश्‍वासन जेटलींना पाळावे लागणार आहे. त्यामुळे सोमवारच्या अर्थसंकल्पात जेटली करातून सूट कमी करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाढत्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी अर्थमंत्र्यांना अप्रत्यक्ष कर वाढवावे लागतील किंवा नवा कर लावावा लागेल. सेवाकर गेल्याच वर्षी १४.५ टक्के करण्यात आला होता. यामध्ये वाढ करून जीएसटीमध्ये लावण्यात येणार्‍या १८ टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रस्ताव सादर होऊ शकतो. याशिवाय स्टार्ट अप इंडिया किंवा डिजिटल इंडिया यासारख्या महत्त्वाकांक्षी योजनांसाठी अधिभार लावला जाण्याची शक्यता आहे.
गुंतवणुकीच्या चक्राला चालना देण्यासाठी अर्थमंत्र्यांना काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत. २०१५-१६ या आर्थिक वर्षात भांडवली खर्चात २५.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. जीडीपीच्या टक्केवारीत विचार करायचा झाल्यास हे प्रमाण १.७ टक्केच आहे आणि ते २ टक्क्यांपर्यंत वाढण्याची गरज आहे. याशिवाय पायाभूत क्षेत्रावरही अर्थमंत्र्यांना भर द्यावा लागणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26956

Posted by on Feb 29 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (794 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२८ फेब्रुवारी] - भारतीय रेल्वे २०१६-१७ मध्ये दररोज सात किलोमीटर मार्गाचे निर्माण कार्य हाती घेणार आहे. गेल्या सहा ...

×