Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » जेटली, फडणवीस, गोयल भारताचे प्रतिनिधी

जेटली, फडणवीस, गोयल भारताचे प्रतिनिधी

=विश्‍व आर्थिक मंच बैठकीसाठी पंतप्रधानांनी केली निवड=
arun jaitley-devendra fadanvis-piyush goelनवी दिल्ली, [१४ जानेवारी] – येत्या २१ ते २४ जानेवारीदरम्यान स्वित्झर्लंडमध्ये होणार्‍या विश्‍व आर्थिक मंच २०१५ या वार्षिक बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड केली आहे. याशिवाय केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली व ऊर्जा मंत्री पीयूष गोयल हेदेखील या बैठकीत सहभागी होणार आहेत.
विश्‍व आर्थिक मंचाची (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) ४५ वी वार्षिक बैठक २१ ते २४ जानेवारीदरम्यान स्वित्झर्लंडच्या डाव्होस शहरात होणार आहे. जगभरातील २५०० राजकीय नेते, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते या बैठकीला हजेरी लावण्याची शक्यता असून, सध्या जगाला भेडसावत असलेल्या महत्त्वाच्या समस्यांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने त्याठिकाणी ऊहापोह केला जाणार आहे. ‘द न्यू ग्लोबल कॉन्टेक्टस’ अशी यावेळच्या बैठकीची थिम असणार आहे आणि १९८९ मध्ये सुरू झालेल्या आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीनंतर जगभरात झालेल्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक बदलांच्या कालावधीचे प्रतिबिंब यामध्ये उमटलेले दिसेल, असे डब्ल्युईएफच्या सूत्राने याबाबत माहिती देताना सांगितले.
२०१५ च्या डाव्होस बैठकीच्या अजेंड्यावर असलेल्या चार प्रमुख विषयांमध्ये संकट व सहकार्य, विकास व स्थिरता, नावीन्यपूर्ण कल्पना व उद्योग आणि समाज व सुरक्षा यांचा समावेश आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19728

Posted by on Jan 15 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (2229 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१४ जानेवारी] - देशातील पहिली इको फेंरडली ट्रेनचं काल मंगळवारी मोठया थाटामाटात उद्द्याटन करण्यात आलंय. सीएनजी रेल्वे काल ...

×